---Advertisement---

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभूत; दाखवला बाहेरचा रस्ता

---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (२७ जुलै) बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रूप डीमधील सामन्यात नेदरलँडच्या मार्क कुल्जेवने भारताचा स्टार खेळाडू साई प्रणीतला २-० ने पराभूत केले. त्यामुळे तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला आहे.

या सामन्यात प्रणीतला एकदाही वरचढ कामगिरी करता आली नाही आणि त्याचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मार्कने प्रणीतला २१- १४ असे पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही मार्कने प्रणीतला पहिल्या सेटप्रमाणेच २१- १४ ने पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. (Sai Prneeth goes down against Mark Caljouw In Group D)

मार्कबद्दल बोलायचं झालं, तर तो ऑलिंपिक्समध्ये पुरुषांच्या एकेरी गटात राऊंड १६ मध्ये पोहोचणारा पहिलाच डच खेळाडू आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना

-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---