---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यावर भारतासाठी ‘हे’ 3 क्रिकेटर करू शकतात पदार्पण..!

On: सोमवार, मे 26, 2025 9:39 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर शुबमन गिलला कर्णधारपद देण्यात आले आहे. (Team India New Test Captain Shubman Gill) पण, भारतीय संघात असे 3 खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात. यादीत पहिले नाव साई सुदर्शनचे आहे, ज्याने 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1,957 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 7 शतकेही झळकावली आहेत.

त्याच वेळी, अभिमन्यू ईश्वरनलाही संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अभिमन्यूने 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7.674 धावा केल्या आहेत. तो अनेक वेळा भारतीय संघात सामील झाला आहे. परंतु आतापर्यंत त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. परंतु यावेळी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. (Sai Sudarshan, Abhimanyu Easwaran and Arshdeep Singh could make their Test debuts for India)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव (Indian team for England tour)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---