साई सुदर्शन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आश्चर्यकारक जोरदार करत आणि नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. सुदर्शनने पहिल्याच सामन्यात आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सामन्यानंतर डाव्या हाताच्या फलंदाजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारतासाठी पहिला सामना खेळताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने 43 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली. 117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने श्रेयस अय्यर याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. बीसीसीआयच्या या व्हिडिओमध्ये सुदर्शनने अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये सुदर्शन म्हणाला, “हे छान वाटतं कारण प्रत्येक तरुणाला देशासाठी खेळायचं आहे, योगदान द्यायचं असतं आणि ट्रॉफी जिंकायची असते. मी खूप आनंदी आहे आणि ही एक अविस्मरणीय भावना आहे.”
फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला, “मला वाटते की, मी परिस्थितीवर चांगली खेळी केली कारण विकेट थोडी अवघड होती, त्यावर खेळणे इतके सोपे नव्हते. पण हो आमच्यात चांगली भागीदारी झाली आणि ती चांगली होती.”
आफ्रिकेतील परिस्थितीबद्दल सुदर्शन पुढे म्हणाला, “मी फक्त दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी भारतासाठी पहिल्यांदा एक सामना खेळला, ज्यामुळे मला परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत झाली.”
Emotions of making his #TeamIndia debut ☺️
That solid partnership with vice-captain @ShreyasIyer15 💪
What it means to his family seeing him play international cricket 👏@sais_1509 shares it all in this post-match interaction 👌 👌 – By @RajalArora #SAvIND pic.twitter.com/Rptsrt71Wi— BCCI (@BCCI) December 18, 2023
पुढे सुदर्शनने पदार्पणापूर्वी त्याच्या कुटुंबियांशी केलेल्या संभाषणाबद्दल सांगितले, म्हणाला, “मला त्यांना सांगण्याची परवानगी नव्हती. पण हो, मी त्यांना थोडंसं सांगितलं आणि त्यांना एक इशारा दिला. ते खूप खुश झाले. जेव्हा त्यांनी नाव पाहिलं. काही आठवड्यांपूर्वी संघात माझं नाव पाहिलं तेव्हा ते खूप आनंदी होते आणि मला वाटतं आजही ते खूप आनंदी असतील.” (Sai Sudarshan’s emotional reaction to international debut Said Playing for the country)
हेही वाचा
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याच्या निर्णयाला गावसकरांचं सर्मथन; म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत त्याने…’
सुदर्शनच्या फलंदाजीची भारतीय दिग्गजालाही भुरळ; थेट भविष्यवाणी करत म्हणाला, ‘तो भारतासाठी 10-15 वर्षे…’