क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे कधी, काय होईल सांगता येत नाही. आयपीएल २०२२चा १६वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. गुजरातने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील सलग तिसरा विजय होता. या सामन्यादरम्यान विचित्र प्रसंग पाहायला मिळाला. गुजरातचा पदार्पणवीर साई सुदर्शन याला या सामन्यादरम्यान अचानक मैदान सोडून बाहेर जावे लागले आणि त्याचा संघ सहकारी शुबमन गिल बराच वेळ त्याची वाट पाहात राहिला.
तर झाले असे की, या सामन्यात (GT vs PBKS) नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या होत्या. पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० वर्षीय साई सुदर्शन (Sai Sudharsan) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सलामीवीर मॅथ्यू वेडच्या विकेटनंतर शुबमन गिलसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेण्याचे काम केले. तो ३० चेंडूंमध्ये ३५ धावा करून बाद झाला.
या खेळीदरम्यान तो २१ धावांवर खेळत असताना त्याला जोराची बाथरूम (Sai Sudharsan Went To Toilet) आली. त्यामुळे आठव्या षटकादरम्यान तो बाथरूमला जाण्यासाठी मैदान सोडून बाहेर गेला. यामुळे काही वेळासाठी सामनाही थांबवण्यात आला. त्याच्यासाठी त्याचा सहकारी शुबमन प्रतिक्षाही करताना दिसला होता. महत्त्वाचे म्हणजे, या प्रसंगानंतर लगेचच दुसऱ्या षटकात स्ट्रॅटिजिक टाइम आऊट देण्यात आला होता. या प्रसंगावरून चाहतेही त्याला ट्रोल करत आहेत.
https://twitter.com/cric_big_fan/status/1512476031550074884?s=20&t=Vqi1scl3NyE8nmrCBxvL2Q
शुबमन गिलची महत्त्वपूर्ण खेळी
गुजरातला हंगामातील सलग तिसरा विजय मिळवून देण्यात शुमबन गिलने (Shubman Gill) महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९६ धावांची शानदार खेळी केली. ५९ चेंडू खेळताना १ षटकार आणि ११ चौकार मारताना त्याने ही खेळी केली होती. मात्र कागिसो रबाडाने मयंक अगरवालच्या हातून त्याला झेलबाद करत त्याला शतक करण्यापासून रोखले.
शुबमननंतर राहुल तेवतियाने संघाला सामना जिंकून देण्यात मोलाचा हातभार लावला. त्याने ३ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने १३ धावा करत संघाला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला.
महत्वाच्या बातम्या-
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य
बॅकफूटवर पडलेल्या सीएसकेकडून रविंद्र जडेजाचे ‘दीडशतक’, धोनी, रैनानंतर ठरला तिसराच खेळाडू