भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. ती क्वॉललंपूर येथे सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली आहे.
सलग दुसऱ्या स्पर्धेत ती पहिल्याच फेरीतून बाहेर पडली आहे. साईनला किम गा युन या कोरियन खेळाडूविरुद्ध २१-१६, १७-२१, १४-२१ असे पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे पीव्ही सिंधूने मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. साईनाने लंडन ऑलिंपिक्समध्ये कांस्यपदक जिंकले होते.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)