भारताचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार आहेत.
एका मिडिया रिपोर्टनुसार त्यांचा लग्नसोहळा 16 डिसेंबरला साधरण 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच 21 डिसेंबरला मोठे रिसेप्शन पार पडेल.
मात्र या बाबत सायना आणि कश्यप यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल विचारले असता त्यांनी त्याला पुष्टीही दिली नाही पण त्याचबरोबर त्यांनी कोणतीही गोष्ट नाकारलीही नव्हती.
तसेच यावर्षी गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर सायनाने सांगितले होते की कश्यपने तिला सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रेरणा देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
सायनाने आत्तापर्यंत 20 विजेतेपदे मिळवली आहेत. ज्यात आॅलिम्पिक कांस्यपदकाचा आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यपदकाचाही समावेश आहे.
त्याचबरोबर कश्यप हा 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. त्यानेही बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत 6 वे स्थानही मिळवले होते. पण त्यानंतर त्याला दुखापतीने घेरल्याने त्याची प्रगती खुंटली.
सायना आणि कश्यप हे 2005 च्या दरम्यान प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असताना भेटले होते.
सायना-कश्यपप्रमाणे क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. यात स्क्वॅशपटू दिपिका पल्लीकल आणि क्रिकेटपटू दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग, कुस्तीपटू गीता फोगाट आणि पवन कुमार, साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियां अशा खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच बॅडमिंटनमध्ये सिक्की रेड्डी आणि सुमित रेड्डी, प्रणव जेरी चोप्रा आणि प्रज्ञा गद्रे, मधुमिता गोस्वामी आणि विक्रम सिंग बिश्त, सईद मोदी आणि अमिता कुलकर्णी या जोड्यांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
-जडेजाच्या नावावर नकोसा विक्रम, यापुर्वीही केलायं असा कारनामा
–Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार