ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने हिमाचल प्रदेशमध्ये बॅडमिंटन अकादमी उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सायना रविवारी (१५ नोव्हेंबर) तिचा पती आणि अर्जुन पुरस्कार विजेता परुपल्ली कश्यपसमवेत हिमाचल प्रदेशात दाखल झाली. येथे त्यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची भेट घेतली. हिमाचलच्या परंपरेनुसार दत्तात्रेय यांनी सायना आणि कश्यप यांचा हिमाचली टोपी आणि शाल देऊन सत्कार केला आणि त्यांना राजभवनाचा फोटो स्मृतिचिन्ह भेट दिली.
याप्रसंगी बोलताना सायना म्हणाली की, “उत्तर भारतातील खेळाडूंना बॅडमिंटन कोचिंग घेण्यासाठी हैदराबाद किंवा बेंगलोर येथे जावे लागत आहे. त्यामुळे तिला हिमाचलमध्ये अकादमी सुरू करायची आहे. या अकादमीमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरुन ते जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील. 30 वर्षांच्या या खेळाडूने सांगितले की, चांगल्या खेळासाठी प्रशिक्षक ही खूप महत्वाची भूमिका असते आणि कामगिरी सुधारण्यासाठी कोचिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले पाहिजे.”
It was really nice to meet u sir 🙏🙏 @jairamthakurbjp pic.twitter.com/gupdR4CoSo
— Saina Nehwal (@NSaina) November 15, 2020
धर्मशाळेतील क्रिकेट स्टेडियमचेही सायनाने कौतुक केले आणि सांगितले की, बऱ्याच खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावली, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर ते पिछाडीवर आहेत. कश्यप या प्रसंगी म्हणाले की, बरेच खेळाडू प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते, तर हे प्रशिक्षण हिमाचलमध्येही देता येऊ शकते. कारण त्यासाठी राज्याकडे बरीच क्षमता आहे. ते म्हणाले की बॅडमिंटनचा प्रश्न आहे की हा एक महागडा खेळ असून अनेक प्रशिक्षक व सुविधांपासून वंचित आहे.
अगदी लहानपणापासून सायना नेहवाल बॅडमिंटनशी जोडली गेली आहे. 2006 पासूनच तिने 19 वर्षांखालील वयोगटातून किताब नावावर करायला सुरुवात केली होती. 2012 साली तिने भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावून दिले. कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने दोनदा सुवर्णपदक पटकावले आहे. यासह इतरही अनेक प्रकारांत तिने यश मिळवले आहे. सायनाने आतापर्यंत 24 किताब आपल्या नावावर केले आहेत. 433 सामन्यांत तिने विजय मिळवला आहे, तर मात्र 196 सामन्यांत तिला पराभव पाहायला लागला आहे. याशिवाय ती सध्या राजकारणातही सक्रिय आहे.
वाचा-
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा – सायना नेहवाल, पी कश्यपची स्पर्धेतून माघार
बॅडमिंटन खेळाडूंसाठी वाईट बातमी; या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या रद्द
‘मी रिटायर होतेय’ अशा ट्विटने सिंधू चाहते गोंधळले, पाहा काय आहे प्रकरण