मुंबई । कोरोना विषाणूच्या साथीमुळे इंडिया ओपन सुपर 500 आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धा रद्द झाल्या आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या बदललेल्या वेळापत्रकामध्ये या स्पर्धांना जागा मिळू शकली नाही. मार्चमध्ये इंडिया ओपनचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु या स्पर्धेला डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात होते. तसेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धा 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत लखनऊमध्ये होणार होते.
बीडब्ल्यूएफने म्हटले आहे की, ‘बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर 2020 साठी सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करेल. थॉमस आणि उबर चषकचे आयोजन करण्यात येणार आहे. तो 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळला जाईल. त्याखेरीज यापुढे कसलेही स्पर्धा होणार नाहीत.’ मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपपासून संपूर्ण बॅडमिंटन हंगाम थांबला आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने ट्वीट केले की, “कोरोना विषाणूच्या साथीमुळे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि इंडिया ओपन स्पर्धा यावर्षी होणार नाहीत. खेळाडूसाठी सर्व संबंधित सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. आम्ही 2021 मध्ये परत येण्याची आशा करतो.”
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर, आशियाई टूरवर सलग दोन सुपर 1000 स्पर्धा होणार आहेत, ज्यांचे यजमानपद कुणाला दिले जाणार हे अद्याप जाहीर केलेले नाहीत. बीडब्ल्यूएफने मे महिन्यात सुधारित कॅलेंडरची घोषणा केली होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर
विराट कोहली बाप होणार असल्याची बातमी कळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची उडाली झोप
नवरा क्रिकेटच्या मैदानात तर बायको तमिळ चित्रपट सृष्टीत करतेय धमाका
ट्रेंडिंग लेख –
‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?
वाढदिवस विशेष: धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा
एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी