fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी

3 Unbreakable IPL Records Of MS Dhoni

August 28, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलचं नाव काढलं की, अधिकतर लोकांच्या डोळ्यासमोर २ संघ उभे राहतात, एक म्हणजे मुंबई इंडियन्स आणि दूसरा म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. त्यातही जर चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)विषयी बोलायचं झालं तर, सर्वांना आठवतो संघाचा कर्णधार एमएस धोनी.

आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीला संघातील खेळाडूंकडून त्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन कसे करवून घ्यायचे, याची चांगली समज आहे. तसेच त्याच्या मैदानावर परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळेही तो एक उत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध होते. धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेला एक-दोन नव्हे तर तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.

संघाचे नेतृत्त्व करण्याव्यतिरिक्त त्याने यष्टीरक्षण आणि फलंदाजी विभागातही शानदार प्रदर्शन केले आहे. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. यात असेही काही विक्रम आहेत, जे कोणत्याही खेळाडूला मोडणे जवळपास अशक्य गोष्ट आहे. या लेखात आपण त्याच ३ दमदार विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.

एमएस धोनीचे तीन आयपीएल विक्रम, ज्यांना मोडणं आहे कठीण (3 Unbreakable IPL Records Of MS Dhoni) –

यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स 

धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग असणाऱ्या धोनीने आतापर्यंत एकूण १९० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १८३ डावात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत यष्टीमागे तब्बल १३२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ९४ फलंदाजांना झेलबाद तर ३८ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

धोनीपाठोपाठ दिनेश कार्तिक यष्टीमागील १३१ विकेट्ससोबत दूसऱ्या क्रमांकावर आहे. पण, आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनीच्या यष्टीमागील विकेट्सची संख्या वाढू शकते. त्यामुळे धोनीच्या पुढे जाणे कार्तिकसाठी आव्हानात्मक काम असेल.

सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार 

धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा अव्वल क्रमांकाचा कर्णधार आहे. आजवर त्याने संघाचे नेतृत्त्व करत असताना १७४ सामने खेळले आहेत. त्यातील १०४ सामने त्याने जिंकले आहेत. धोनीच्या या विक्रमाच्या आसपासही कोणी नाही.

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा तर याबाबतीत धोनीच्या खूप मागे आहे. त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्त्व करत असताना ६० सामने जिंकले आहेत. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर, गौतम गंभीर ७१ सामन्यांसह दूसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने खेळणारा खेळाडू

धोनीच्या नेतृत्त्वाखालील सीएसके संघ आयपीएलमध्ये खेळलेल्या १० हंगामात तब्बल ८वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. त्यात त्यांना ३वेळा अंतिम सामना जिंकण्याचे सौभाग्य लाभले आहे. तर उर्वरित ५वेळा त्यांनी अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. दरम्यान आठही वेळेला धोनी संघाचा भाग होता. तसेच, राइजिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळतानाही धोनी एकदा अंतिम सामन्यात खेळला आहे.

अशाप्रकारे त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक ९वेळा अंतिम सामने खेळले आहेत. त्यामुळे धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा खेळाडू आहे.

ट्रेंडिंग लेख –

कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

वेस्ट इंडिजच्या या ३ स्टार खेळाडूंच्या नशिबी आला फक्त एक आयपीएल हंगाम

भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या यूएईतील कोरोनाची परिस्थिती, आतापर्यंत झालाय इतक्या लोकांचा मृत्यू

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

राजस्थान रॉयल्सचा संघ दुबईत रात्री करतोय सराव; जाणून घ्या काय आहे कारण


Previous Post

मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती शंभर टक्के पूर्ण करतो – अजिंक्य रहाणे

Next Post

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली; संघांना मिळाले प्रायोजक

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड

April 20, 2021
Next Post

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली; संघांना मिळाले प्रायोजक

ज्या गोष्टींसाठी विराटने घेतली मेहनत, आता म्हणतोय त्याच गोष्टी नाही ठेवणार घरात

'या' महिन्यापासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करा; रणजी क्रिकेटमधील बॉसची मागणी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.