fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या यूएईतील कोरोनाची परिस्थिती, आतापर्यंत झालाय इतक्या लोकांचा मृत्यू

IPL 2020 Host by UAE what is Covid Pandemic Situation death rate Covid-19 Pandemic in the United Arab Emirates

August 27, 2020
in Covid19, IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यावर्षी भारतात होणार नसून यूएईत होणार आहे. आयपीएलचे आयोजन आपल्या देशात करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रस्ताव ठेवला होता. परंतु बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यूएईत करणे योग्य असल्याचे समजले. भारत सरकारनेही सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतरच आयपीएलचे आयोजन यूएईत करण्याची परवानगी दिली आहे.

यावर्षी आयपीएल २०२०चे आयोजन २९ मार्चपासून होणार होते. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. आधी आशिया चषक आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित केल्यानंतर आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

यूएईत कोरोना व्हायरसमुळे झालेत केवळ ३७८ मृत्यू

यूएईत कोरोना व्हायरसमुळे २५ ऑगस्टपर्यंत ३७६ मृत्यू झाले आहेत. म्हणजेच तेथील मृत्यू दर हा ०.६ टक्के आहे, तर २७ ऑगस्ट रोजी मृत्यूची संख्या २ने वाढली असून ३७८ इतकी झाली आहे. तेथे आतापर्यंत कोरोना व्हायरसची एकूण ६८५११ प्रकरणे समोर आली आहेत. भारतातील डझनभर राज्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वात कमी आहे. त्यांतील ५९,४७२ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या लोकांचा दर हा ८७.१ टक्के इतका असून हा आकडा वाढतच जात आहे. सध्या केवळ ८६६१ रूग्ण कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत.

यूएईची लोकसंख्या जवळपास ९९ लाख आहे. यूएईमध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशसोबतच इतर देशांमधून येऊन काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. लॉकडाऊनवेळी यांतील अनेक लोक आपापल्या देशात परतले आहेत. त्यामुळे आता तेथील लोकसंख्या खूप कमी झाली आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोकाही कमी झाला आहे.

जूनपासून ऑगस्टपर्यंत यूएईत दररोज ५ पेक्षाही कमी लोकांचा झालाय मृत्यू

विशेष म्हणजे जूनपासून ऑगस्टपर्यंत म्हणजेच मागील ३ महिन्यांदरम्यान यूएईत दररोज ५ पेक्षाही की लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या १३ राहिली आहे. ही १० मे ची आकडेवारी होती. १० लाख प्रति लोकसंख्येमागे ६७९१ प्रकरणे समोर येत आहेत.

आबू धाबी आणि शारजाह येथे आयपीएलच्या सामन्यांच्या आयोजनापेक्षा अधिक कठीण परिस्थिती दुबईत होऊ शकते. कारण दुबई हे यूएईतील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. त्यामुळे तिथे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राजस्थान रॉयल्सचा संघ दुबईत रात्री करतोय सराव; जाणून घ्या काय आहे कारण

-कोलकाता नाइट रायडर्स संघाला दुसरा झटका; हा खेळाडू झाला स्पर्धेबाहेर

-ऑस्ट्रेलियन कर्णधार कसोटी कारकिर्द संपल्याची दिली कबूली, २०२३ला वनडेलाही करणार बाय बाय

ट्रेंडिंग लेख-

-वेस्ट इंडिजच्या या ३ स्टार खेळाडूंच्या नशिबी आला फक्त एक आयपीएल हंगाम

-भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल

-कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर


Previous Post

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

Next Post

प्रेग्नंसीची बातमी गुप्त ठेवण्यासाठी विराट-अनुष्काचे होते असे नियोजन

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

प्रेग्नंसीची बातमी गुप्त ठेवण्यासाठी विराट-अनुष्काचे होते असे नियोजन

कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या 'या' ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.