---Advertisement---

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच हा पुरस्कार मिळवणारा तो केवळ चौथा क्रिकेटपटू आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर,  एमएस धोनी आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंना हा पुरस्कार मिळाला आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की सचिन, धोनी आणि विराट यांच्या पंक्तीत बसायला मिळणे हे आनंददायी आहे.

रोहित शर्माचा एक व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने म्हटले आहे की ‘क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे. मी खूप आनंदी असून हे माझे सौभाग्य आहे. मी बीसीसीआयला माझ्या नावाची शिफारस केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि क्रीडामंत्र्यांनाही धन्यवाद देतो. मी वचन देतो की मी मेहनत करत राहिल आणि देशाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न पुढेही कायम असेल.’

तसेच खेलरत्न पुरस्कार मिळवणारा केवळ चौथा क्रिकेटपटू होण्याबद्दल मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित म्हणाला, ‘अशा एका ग्रुपचा (सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली) भाग होणे मस्त आहे. त्यांनी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि देशाला आनंद दिला आहे. त्यांच्याबरोबर या यादीत सामील होणे, हा एक सन्मान आहे. मला याबद्दल खूप आनंद आहे.’

रोहित पुढे म्हणाला, ‘तूम्ही देशासाठी जे काही करता त्यासाठी ओळखले जाणे, हे प्रेरणादायी आहे. मी यापुढेही देशाला आनंद देण्याचा प्रयत्न करत राहिल. माझ्या चाहत्यांना, माझे पाठिराख्यांना आणि माझ्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद. तूमच्याशिवाय हे शक्य झाले नसते. असाच पाठिंबा राहू द्या आणि संघाच्याही पाठिशी कायम रहा. खूप आभार.’

रोहित आता १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२० मधून मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. यावेळी आयपीएल कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात न होता युएईमध्ये होणार असून सध्या सर्व संघांचे खेळाडू युएईला पोहचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

राजस्थान रॉयल्सचा संघ दुबईत रात्री करतोय सराव; जाणून घ्या काय आहे कारण

कोलकाता नाइट रायडर्स संघाला दुसरा झटका; हा खेळाडू झाला स्पर्धेबाहेर

ऑस्ट्रेलियन कर्णधार कसोटी कारकिर्द संपल्याची दिली कबूली, २०२३ला वनडेलाही करणार बाय बाय

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल

ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली

कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---