---Advertisement---

‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2020 1:50 PM
---Advertisement---

बदलत्या वेळेनुसार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शानात बदल होत गेले. भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याचा भारतीय संघाविषयी बोलायचं झालं तर, संघात एकापेक्षा एक दमदार खेळाडू उपलब्ध आहेत. ज्यांनी भारताला २००७ सालचा टी२० विश्वचषक आणि २०११ आणि २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कुलदिप यादव आणि रविंद्र जडेजा हे सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही वर्षांपासून दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. अशात कोणत्या नवीन खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळणे सोपे नसेल.

असे असले तरी, आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या काही देशांतर्गत खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात आजमावले जाऊ शकते आणि स्वत:हून आलेल्या संधीला कोणता खेळाडू सोडेल. संधी मिळाल्यानंतर ते खेळाडूही त्यांचे प्राण पणाला लावून आपले उत्कृष्ट देत संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील. या लेखात आयपीएलमध्ये खेळणाऱ्या २ दमदार देशांतर्गत भारतीय गोलंदाजी अष्टपैलूंचा आढावा घेण्यात आला आहे, जे येत्या काळात भारतीय संघाचे नियमित सदस्य बनू शकतात.

येत्या काळात भारतीय संघाचे नियमित सदस्य बनू शकणारे दोन गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटू (These 2 Players Can Play For Indian Team Soon) –

२. श्रेयस गोपाल – Shreyas Gopal

कर्नाटकचा गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटू श्रेयस गोपाल हा यंदा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. त्याच्या गुगली चेंडूपुढे मोठमोठे फलंदाज त्यांचे गुडघे टेकवतात. आयपीएल २०१९मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या एका सामन्यात हॅट्रीक घेतली होती. दरम्यान त्याने विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससारख्या दिग्गजांना बाद केले होते.

श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९.३७च्या सरासरीने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीत कमाल करणारा हा खेळाडू फलंदाजीतही मागे नाही. त्याने आयपीएलमध्ये १४ डावात जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन करत १२७ धावा केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

१. कृष्णप्पा गॉथम – Krishnappa Gowtham

भारतीय संघात लवकरच दमदार एंट्री करु शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दूसरे नाव येते, कर्नाटकच्या कृष्णप्पा गॉथमचे. तो एक दमदार खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागामध्ये शानदार प्रदर्शन करण्यास सक्षम आहे. सोबतच तो क्षेत्ररक्षणातही माहीर आहे. तो यंदा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.

कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये त्याने एका सामन्यात ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने १३४ धावांची धुरंदर खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याने १५ धावा देत ८ विकेट्स चटकावत शानदार विक्रम आपल्या नावावर केला होता. आयपीएल कारकिर्दीत गॉथमने २२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२ सामन्यात १४४ धावा आणि १२ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याच्या या दमदार प्रदर्शनाला पाहता, त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते. जर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली तर तो नक्कीच आपल्या प्रदर्शानच्या जोरावर संघाला एकहाती सामने जिंकून देऊ शकतो.

ट्रेंडिंग लेख –

एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

महत्त्वाच्या बातम्या –

या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड फिटनेसवर देते जोर; पेशाने आहे ‘शेफ’

इंग्लंडसाठी वाईट बातमी; पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी हा स्टार खेळाडू झाला जखमी 

विराट यंदा सनराइजर्स हैद्रबादकडून शानदार कामगिरी करण्यास सज्ज; तर ‘या’ ४ खेळाडूंवरही असेल सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---