कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ चा पहिला उपांत्य सामना मंगळवारी (१४ सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात सेंट लूसिया किंग्ज आणि ट्रिनबॅगो नाइट रायडर्स हे संघ एकमेकांशी भिडले. यामध्ये सेंट लूसिया किंग्जने ट्रिनबॅगो नाइट रायडर्सवर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
सामन्यात सेंट लूसिया संघाने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ४ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करणारा नाइट रायडर्स संघ १८४ धावांपर्यंत पोहचू शकला. त्यामुळे त्यांनी २१ धावांनी सामना गमावला. सेंट लूसियाच्या विजयामध्ये सर्वात महत्वाचे योगदान अष्टपैलू डेविड वीसाचे ठरले.
या सामन्यातील विजयामुळे सेंट लूसिया किंग्जने ट्रिनबॅगो नाइट रायडर्सचा मागच्या हंगामातील पराभवाचा बदला घेतला आहे. सीपीएलच्या च्या २०२० च्या हंगामात नाइट रायडर्सने लूसिया किंग्जला हरवून स्पर्धा जिंकली होती.
डेविड वीसाने संघासाठी फलंदाजी करताना २१ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजीत त्याने सर्वोत्तम प्रदर्शन करत ३९ धावा देत नाइट रायडर्स संघाच्या पाच विकेट्स मिळवल्या. त्याव्यतिरिक्त सेंट लूसियाच्या मार्क दयालने ४४ चेंडूत ७८ धावांची केळी केली, यामध्ये त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. तसेच पॉवर हिटर टिम डेविडने १७ चेंडूत ३८ धावा केल्या, यामध्ये त्याने चार षटकार मारले.
सीपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक रामपाॅलने नाईट रायडर्सकडून एक विकेट घेत चार षटकांत ५६ धावा दिल्या, तसेच खॅरी पियरेनेही १ विकेट घेत ५१ धावा दिल्या. याशिवाय अकिल हुसेन आणि सुनील नरेन यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
टी २० विश्वचषकामध्ये नामीबिया संघात सामील झालेल्या डेविड वीसने सेंट लूसिया किंग्जच्या विजयामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. सेंट लूसियाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतग्रस्त झाला असून संघाने त्याच्या गैरहजेरीत हा उपांत्य सामना खेळला आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व आंद्रे फ्लेचर याने सांभाळले.
वीसीने फलंदाजीदरम्यान चार षटकार आणि एक चौकार मारत विरोधी गोलंदाजांचे कंबरडे मोडले होते. तसेच त्याने गोलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सुनील नरेनला बाद केले. काॅलिन मुनरो याची विकेटही त्यानेच घेतला. वीसीने यानंतर कायरन पोलार्ड, टिम सेफर्ट आणि अकील हुसेन यांच्याही विकेट्स घेतल्या. वीसीशिवाय लूसिया किंग्जकडून किमो पाॅल आणि वाहाब रियाज यांनी २-२ विकेट्स मिळवल्या.
त्यामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सहमालकी असलेल्या नाईट रायडर्स संघाचा डाव १९.३ षटकातच १८४ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून नरेनेच सर्वाधिक ३० धावा केल्या. तसेच अन्य ४ फलंदाजांनी २० धावांचा आकडा पार केला पण त्यांना ३० धावांच्या वर जाता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
दिवाळीआधी देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! बीसीसीआय करणार घसघशीत वेतनवाढ
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! मैदानात पुन्हा दिसणार प्रेक्षक, युएई सरकारने दिली परवानगी
Video: महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान म्हणत मुंबई इंडियन्सने सादर केले नवे मराठी थीम साँग