---Advertisement---

Video: महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान म्हणत मुंबई इंडियन्सने सादर केले नवे मराठी थीम साँग

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 5:01 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास चार दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मे महिन्यात कोरोनाच्या कारणास्तव स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करावी लागलेली. त्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर, अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

आयपीएलच्या या दुसऱ्या भागासाठी सर्व संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आपल्या संघाचे नवीन थीम साँग लॉन्च केले. या थीम साँगमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मुंबई इंडियन्सचे नवे थीम साँग
आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम सुरू होण्याआधी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपले थीम साँग नव्या रूपात सादर केले. संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे मराठी गाणे लाँन्च करण्यात आले. त्यांनी या ट्विटला मराठीत कॅप्शन देताना ‘मुंबई इंडियन्स, महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान. चला पलटण, आयपीएल २०२१ मध्ये होऊन जाऊ द्या आपलाच आवाज,’ असे लिहिले दिले आहे.

या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पंड्या फेटा घातलेले दिसून येत आहेत. तर, संघातील इतर खेळाडू नृत्य करताना दिसतायेत. मुंबई इंडियन्सच्या संघमालकीण नीता अंबानी यांनीदेखील आपल्या चाहत्यांना मराठीतून संदेश दिला.

आयपीएल २०२१ साठी मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिलने, नॅथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईमधील भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी विराट कोहली आला पुढे; म्हणाला, ‘अनुष्काकडून मिळाली प्रेरणा’

द्रविड बनू शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

‘त्याने क्षणातच होकार दिला’, उथप्पाने सांगितला धोनी सोबतचा २००७ टी २० विश्वचषकातील खास किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---