विमेंस प्रीमियर लीग 2024 हंगामाची सुरुवात शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने झाली. या सामन्यात मुंबईकडून दिल्ली संघाला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यास्तिक भाटिया यांनी अर्धशतके केली. शेवटच्या चेंडूवर सजीवन सजना हिने षटकार मारल्यामुळे दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई इंडियन्स संघाने विमेंस प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) च्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 20 षटकांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ 5 विकेट्सच्या नुकसानावर 171 धावा करू शकला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने डावातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावा मुंबई संघाने केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 34 चेंडूत 55 धावा करून शेवटच्या षटकात बाद झाली. त्याआधी यास्तिका भाटिया 45 चेंडूत 57 धावा करून 14व्या षटकात बाद झाली.
शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर पूजा वस्त्राकर बाद झाली. त्याने पुढच्या तीन चेंडूत मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर सात धावा जोडल्या गेल्या. षटकातील पाचव्या चेंडूवर हरमनप्रीत कौर बाद झाला. अशात शेवटच्या एका चेंडूवर जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 5 धावा हव्या होत्या. डब्ल्यूपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळणार सजना यावेळी स्ट्राईकवर होती. शेवटच्या चेंडूवर 5 धावा हव्या असतानाही तिने दबावाचा चांगल्या प्रकारे सामना केला आणि उत्कृष्ट षटकार मारला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामी फलंदाज शेफाली वर्णा एक धाव करून तंबूत परतली. त्यावेळी संघाची धावसंक्या अवघी 3 धावा होती. पण दुसर्या विकेटसाठी मॅग लेनिंग आणि एलिस कॅप्सी यांच्यात 64 धावांची भागीदारी झाली. मॅग 31 धावा करून बाद झाला. पण एलिस कॅप्सीने 53 चेंडूत 75 धावांची जबरदस्त खेळी केली. जेमिमा 24 चेंडूत 42 धावा करून बाद झाली. मारिझान कॅप हिनेही 9 चेंडूत 16 धावा केल्या. (Sajivan Sajna hit a last-ball six to lead Mumbai Indians to victory in the first match of WPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारतीय क्रिकेटपटूचे सामन्यानंतर निधन, ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय