नुकताच ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला. या खास दिनी अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या दिनाचे औचित्य साधून इंडियन प्रीमीयर लीग (IPL) मधील दुसरा सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) नेही एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ चेन्नई संघातील क्रिकेटपटूंच्या पत्नी एकत्र मिळून त्यांचे अनुभव शेअर करताना दिसल्या. चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिने सांगितले आहे की, क्रिकेटपटूंच्या पत्नीला त्यांच्या पतीच्या यशावर कशाप्रकारे अभिमान वाटतो?. तसेच त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांबाबतही तिने उलगडे केले आहेत.
भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आमचे पती या कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या देशाचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्त्व करतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे साक्षीने सांगितले आहे.
क्रिकेटपटूंच्या पत्नींना लग्नानंतर स्वत:ला बदलावे लागते
तसेच पुढे बोलताना साक्षीने एका प्रोफेशनल क्रिकेटपटूसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या पत्नीला कशाप्रकारे परिस्थितीसोबत सामायिक व्हावे लागते, याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
ती म्हणाली की, “क्रिकेटपटूसोबत लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. सहसा जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते, तेव्हा तिचा पति ऑफिसवर कामाला जातो. परंतु आमचे पती क्रिकेट खेळायला जातात. त्यामुळे मला वाटते की, आम्हाला या वेगळ्या परिस्थितीत सामायिक व्हावे लागते. आम्हाला त्यांच्या अपेक्षांनुसार स्वतमध्ये बदल करावे लागतात आणि त्यांना तणावापासून दूर ठेवावे लागते.”
प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी बनणे आहे आव्हानात्मक
धोनी आणि साक्षीने २०१० मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यापूर्वी २ वर्षे ते एकमेकांसोबत राहिले होते. यादरम्यान साक्षी बऱ्याचदा धोनीसोबत दौऱ्यांवर गेली होती. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांदरम्यान ती धोनीला चीयर करत त्याचा आत्मविश्वास वाढवतानाही दिसली होती. मात्र एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी असणे किती आव्हानात्मक असते (Sakshi Dhoni On Challanges Of Marrying Famous Cricketer), हे तिने सांगितले आहे.
साक्षी म्हणाली की, “एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी बनल्यानंतर तुमच्यासाठी कोणती खासगी जागा उरत नाही. आम्ही तसे राहू शकत नाही, जसे आता या कॅमेरापुढे आहोत. काही लोक आमच्या खोलींपुढे तैनात असतात, तर काही नसतात. लोक आम्हाला छोट्या-मोठ्या गोष्टींवरून जज करू लागतात. अगदी आम्ही आमच्या मित्रांसोबत जरी फिरत असलो तरीही ते आमच्याविषयी मागे बोलू लागतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
WIvENG| लाजिरवाण्या सुरुवातीनंतर बेअरस्टोची शतकी झुंज; पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड ६ बाद २६८
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर