रिओ ऑलम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक हिने आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून रौप्य पदक निश्चित केले आहे. रिओ २०१६ च्या सामन्यानंतर जवळपास एक वर्षानंतर साक्षीने उत्तम कामगिरी करत पुन्हा पदार्पण केले आहे. साक्षीने ६० किलो वजनी गटात उत्तम खेळी करून कझाखस्तानच्या आयौलं कस्यामोवा (Ayaulam Kassyamova) हिचा १५-३ ने पराभव करून अंतिम सामन्यासाठी आपले स्थान कायम केले.
अंतिम सामन्यात साक्षीची लढत जपानची ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेती रीस्को क्वी (Risako Kawai)हिच्या सोबत होणार आहे.
मागच्या आठवड्यात साक्षीने आशियाई स्पर्धेच्या निवड प्रक्रियेदरम्यान राष्ट्रीय विजेती मंजू कुमारी हीचा १०-० ने पराभव केला होता.