---Advertisement---

साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ‘अशी’ घेतली होती मेहनत

---Advertisement---

भारताची पहिली ऑलिंपिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने नुकतेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या ‘द ए-गेम बाय पीव्ही सिंधू’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल भाष्य केले आहे.

या कार्यक्रमात साक्षी म्हणाली, 2016 च्या रिओ ऑलिंपिकच्या तीन महिने आधी घेतलेली मेहनत फार महत्त्वाची ठरली होती. ती म्हणाली, ‘रिओ ऑलिंपिकपूर्वी आम्ही परदेशात तीन महिने मेहनत घेतली होती. आम्ही वेगवेगळ्या देशांतील कुस्तीपटूंसह ट्रेनिंग केली होती. माझी विश्वविजेत्या आणि ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूबरोबर लढत झाली होती.’

पुढे साक्षी म्हणाली, ‘या दरम्यान मी अनेक तांत्रिक गोष्टी शिकले. माझ्यासाठी हे उपयोगी ठरले. त्या शिबिरातून महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. याच जोरावर मी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी झाले.’

रिओ ऑलिंपिकमध्ये साक्षीने रेपेचेज राऊंडमध्ये किर्गिस्तानच्या अयसुलू टी विरुद्ध 0-5 अशा पिछाडीनंतर शानदार पुनरागमन करत 8-5 ने सामना जिंकला होता. तसेच कांस्यपदकारवर आपली मोहोर उमटवली होती. एवढेच नाही तर त्यावेळी ती ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

या सामन्याबद्दल बोलताना साक्षी म्हणाली, ‘मला माहित होते की मी 0-5 ने पिछाडीवर आहे, पण माझ्याकडे वेळ होता आणि मी पुनरागमन करु शकत होते. याआधीही मी अनेक सामन्यात पुनरागमन केले होते. मला माझे प्रशिक्षक कुलदीप सरांनी सातत्याने सांगितले होते की मी माझा खेळ खेळायला हवा. त्यानंतर मी आक्रमक पवित्रा घेतला आणि विजय मिळवण्यात यशस्वी झाले. मी शेवटपर्यंत हार मानली नव्हती.’

तिने ऑलिंपिक व्यतिरिक्त 2014 मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. तर 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. तिचा 2016 ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानही झाला होता.

सध्या साक्षी समोर 2021 ला होणाऱ्या टोकीयो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात

विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी

मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---