गुरुवारी (दि. 21 डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने माध्यमांशी बोलताना आपले बूट टेबलवर ठेवून कुस्तीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाने नवीन अध्यक्षाची घोषणा केल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे.
साक्षी मलिक रडत म्हणाली, “जो आज महासंघाचा अध्यक्ष झाला आहे. तो अध्यक्ष होणार हे आम्हाला माहीत होतं. ते ब्रिजभूषण यांना पुत्रापेक्षाही प्रिय आहेत. आजवर पडद्यामागे जे घडत होते ते आता उघडपणे घडेल, आम्ही आमच्या लढ्यात यशस्वी झालो नाही. आम्ही आमचा मुद्दा सर्वांना सांगितला आहे. संपूर्ण देशाला परिचित असूनही ते योग्य व्यक्ती बनले नाहीत. मला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सांगायचे आहे की, शोषणासाठी तयार रहा.”
31 वर्षीय साक्षी मलिकने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकले आणि महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली. याशिवाय 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक, 2018 मध्ये कांस्य पदक आणि 2014 मध्ये रौप्य पदक जिंकले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने चार वेळा देशाला मेडल मिळवून दिले होते आणि पदक जिंकण्यात यश मिळवले होते.(Sakshi Malik retires from wrestling Brijbhushan Singh puts it directly on the shoe table)
हेही वाचा
‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’
चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेस बारामती येथे आज(२२ डिसेंबर)पासून प्रारंभ