आयपीएल २०२१ स्पर्धेतील ४७ वा सामना एमएस धोनीचा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण चेन्नई सुपर किंग्स संघाने या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी तुफानी खेळी करत सामना राजस्थान रॉयल्स संघाला जिंकून दिला. चेन्नई सुपर किंग्स संघ पराभूत झाल्यानंतर साक्षी धोनीने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ४७ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर फाफ डू प्लेसिस बाद होऊन माघारी परतला. परंतु ऋतुराज गायकवाडने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली होती. त्याने ६० चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली. यामध्ये ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तर रवींद्र जडेजाने शेवटी येऊन १५ चेंडूंमध्ये ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला ४ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते.
Sakshi Singh Dhoni enjoying CSK vs RR Match at Abu Dhabi! 👍
.
.
.#sakshidhoni #chennaisuperkings #cskvrr #rajasthanroyals #ipl2021 #ipl #ipl14 #abudhabi #sakshi #ipl2018 #ipl #cricketnews #ipl11 pic.twitter.com/JC7qenJO9l— Cricket Universe (@CricUniverse) October 2, 2021
राजस्थान रॉयल्स संघाकडून १९० धावांचा पाठलाग करण्यासाठी एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानात आली होती. एविन लुईस २७ धावा करत माघारी परतला होता. तर यशस्वी जयस्वालने ५० धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने हल्ला बोल करायला सुरुवात केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ४ चौकारांच्या साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. यासह राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
या विजयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित साक्षी सिंग धोनी देखील आश्चर्यचकित झाली होती. तिला विश्वास होत नव्हता की, चेन्नई सुपर किंग्स संघ पराभूत झाला आहे. तिची ही रिॲक्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ती प्रत्येक सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला चियर करण्यासाठी मैदानात उपस्थित राहते. चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असून त्यांचे दोन सामने शिल्लक राहिले आहेत. येणाऱ्या दोन सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन्ही पायांच्या मधून आवेशने उडवली हार्दिकची दांडी, अप्रतिम चेंडूपुढे मुंबईकर निरुत्तर-VIDEO
सीएसकेच्या स्टार क्रिकेटर रैनाची हरवली चमक! चाहते म्हणाले, “आता तू आराम करा, ‘तो’ भारी खेळेल”
स्थान एक, संघ चार; गुणतालिकेतील चौथ्या जागेसाठी काट्याची टक्कर, पाहा सध्या कोण आहे कुठे?