---Advertisement---

माही अन् साक्षीच्या लव्हस्टोरीला १४ वर्षे पूर्ण, फोटोसोबतच मिसेस धोनीच्या हटके कॅप्शनने वेधले लक्ष

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 6:14 PM
MS-Dhoni-and-Sakshi-Dhoni
---Advertisement---

महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली, तरी त्याचा चाहतावर्ग काही कमी झालेला नाही. उलट अजूनही त्याची चर्चा चाहत्या वर्गात होत असते. त्यामुळेच तो भारतात सगळ्यात जास्त चाहतावर्ग असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. दरम्यान, धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते त्याची पत्नी साक्षीने केलेल्या एका पोस्टमुळे.

साल २०१० मध्ये ४ जुलैला धोनी आणि साक्षी सिंग (Sakshi Singh) लग्नबंधनात अडकले. आणि त्यानंतर चाहत्यांनी साक्षीवर सुध्दा तेवढंच प्रेम केलं. हे दोघं भारतीय क्रिकेटची रोमँटिक जोडी झाली. खूप वेळा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.

माजी कर्णधार धोनी जरा लोकांपासून लांबच असतो. तसेच तो जास्त कार्यक्रमांनासुध्दा उपस्थित नसतो आणि सोशल मीडियावरसुध्दा जास्ती सक्रिय नसतो, तर साक्षी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती नेहमी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. ती धोनीचे सुध्दा काही फोटो टाकते. त्यामुळे तेवढंच चाहत्यांना सुद्धा धोनीची एक झलक दिसते.

या जोडीला एकमेकांना भेटून १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. साक्षीने इंस्टाग्रामवर (Sakshi Singh Instagram) तिचा आणि धोनीचा एक सुंदर फोटो शेअर केला. तिने कॅप्शन मध्ये लिहिले, “एकमेकांना भेटून १४ वर्ष झाले त्याच्या शुभेच्छा”

https://www.instagram.com/p/CXqAiaCqcFR/

या दोघांची ओळख कोलकातामधील एका हॉटेलमध्ये झाली होती. धोनी तेव्हा भारतीय संघासोबत त्या हॉटेलमध्ये थांबला होता. साक्षीची धोनीसोबत ओळख दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. अहवालांनुसार धोनीने साक्षीचा नंबर त्याच मैत्रिणीकडून घेतला होता आणि मग ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या ५ वर्षांनंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि तिचं नाव झिवा (Ziva) ठेवण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---