भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. मात्र चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. याचाच प्रत्यय धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोनंतर येत आहे.
आजपासून 2020 हे वर्ष सुरु झाले आहेच. याचनिमित्ताने साक्षीने धोनीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘2020 या व्यक्तीबरोबर.’
या मिस्टर आणि मिसेस धोनीच्या फोटोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/B6vogFwnNBx/
या फोटोवर भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही प्रतिक्रिया देताना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनी भारताकडून त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या भविष्याबद्दल क्रिकेटवर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतात.
पण काही दिवसांपूर्वी त्यानेच एका कार्यक्रमादरम्यान जानेवारी 2020 पर्यंत याबद्दल काहीही विचारु नका असे सांगितले होते.






