माऊंट मॉनगनुई| भारताने आज(28 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला आहे. कोहली हा न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करताना पहिले तीनही वनडे सामने जिंकणारा दुसराच आशियाई कर्णधार ठरला आहे.
याआधी हा विक्रम पाकिस्तानचे माजी कर्णधार सलीम मलिक यांनी केला आहे. त्यांनी मार्च 1994 मध्ये पाकिस्तानचे 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत नेतृत्व करताना पहिले तीनही वनडे सामने जिंकले होते. पण या मालिकेतील चौथा सामना बरोबरीत सुटला होता. तर पाचवा सामना न्यूझीलंडने जिंकला होता.
विराटला न्यूझीलंड विरुद्धच्या चालू असलेल्या वनडे मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता या सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल.
त्याने या मालिकेत पहिल्या सामन्यात 45, दुसऱ्या सामन्यात 43 आणि आज तिसऱ्या सामन्यात 60 धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताच्या ‘कुल-चा’ जोडीने विकेट्सची सेंचूरी केली पूर्ण
–अंबाती रायडूला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकणार नाही गोलंदाजी
–हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी