---Advertisement---

गाबा कसोटीदरम्यान मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट, लवकरच संघाकडून खेळणार

On: रविवार, डिसेंबर 15, 2024 7:55 AM
Mohammad-Shami
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ज्यामध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वांनाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आठवू लागला जो एका वर्षाहून अधिक काळ टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. दरम्यान आता मोहम्मद शमीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मोहम्मद शमीचा आगामी विजय हजारे ट्राॅफीच्या स्पर्धेसाठी बंगालच्या 20 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. कारण तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करू पाहत आहे. ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, शमीसाठी ऑस्ट्रेलियात संघात येण्यासाठी दरवाजे पूर्णपणे खुले आहेत. परंतु शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच संघात परतावे अशी त्याची इच्छा आहे. भारत सध्या ब्रिस्बेनमध्ये तिसरी कसोटी खेळत आहे आणि चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून शेवटचा खेळलेल्या शमीच्या घोट्यावर या वर्षी फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या रणजी स्पर्धेत त्याने पुनरागमन केले आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. यानंतर, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी सर्व 9 सामने खेळले आणि 7.85 च्या इकॉनॉमीने 11 बळी घेतले. मात्र, या स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्यात काही प्रमाणात सूज आली होती.  ज्यामुळे त्याच्या कसोटी क्रिकेटच्या तयारीत अडथळा निर्माण झाला होता.

मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार देखील बंगाल संघाचा एक भाग आहे. ज्याचे नेतृत्व सुदीप कुमार घरामी करणार आहे. संघ 21 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये दिल्लीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. सर्व खेळाडू बुधवारी कोलकाताहून हैदराबादला रवाना होतील. विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीसाठी बंगालचा संघ पुढीलप्रमाणे : सुदीप कुमार घरी (कर्णधार), मोहम्मद शमी, अनुस्तुप मजुमदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सुदीप चॅटर्जी, करण लाल, शाकीर हबीब गांधी (विकेटकीपर), सुमंत गुप्ता, सुभम चॅटर्जी, रणज्योत सिंग खैरा, प्रदिप्ता प्रामाणिक, कौशिक मैती, विकास सिंग, मुकेश कुमार, सक्षम चौधरी, रोहित कुमार, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल, सायन घोष, कनिष्क सेठ

हेही वाचा-

“मी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन…” भारताच्या प्रतिभावान खेळाडूचे मोठे वक्तव्य!
2024 मध्ये अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती, यादीत ‘रोहिराट’चाही समावेश
गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---