---Advertisement---

माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “कर्णधार म्हणून विराट रूटच्या खुप पुढे…”

On: सोमवार, डिसेंबर 13, 2021 10:02 PM
root-virat
---Advertisement---

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुट (joe root) हे दोघेही त्यांच्या संघासाठी सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहेत. चाहत्यांमध्ये अनेकदा विराट आणि रुट यांची तुलना केली जाते. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट (salman butt) यानेदेखील या दोन दिग्गजांची तुलना केली आहे. बट याच्यामते विराट जो रुटपेक्षा खूप पुढे आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका खेळली जात आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रुटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ ९ विकेट्सने पराभूत झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर रुटच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. बटने देखील रुटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बटने रुटची विराटसोबत तुलना केली आहे.

बट यावेळी बोलताना म्हणाला की, “विराट कोहलीकडे विरोधी संघाला आव्हान देण्याची वृत्ती आहे. फलंदाजीदरम्यान तो खूप आक्रमक राहतो. ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीत चांगली फलंदाजी करण्यासाठी ते खूप गरजेचे आहे. आक्रमकता, वृत्ती आणि दृष्टीकोनाच्या बाबतीत विराट कोहली, जो रुटपेक्षा खूप पुढे आहे. जेव्हा रुट खूप संघर्ष करत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे पाहिली जाऊ शकत होती आणि विराटच्या चेहऱ्यावर आपल्याला ही गोष्ट दिसत नाही. कोहलीची देहबोलीरुटपेक्षा खूप चांगली आहे, विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे अधिकच गरजेचे होऊन बसते.”

दरम्यान, ऍशेस मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला गेला होता आणि इंग्लंडला या सामन्यात ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघापुढे पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. दुसरा कसोटी सामना एडिलेडमध्ये १६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. ऍशेस मालिकेत विजय मिळवण्याच्या दृष्टीने इंग्लंड संघाला हा दुसरा सामना जिंकणे खूप आवश्यक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बापरे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय तरी धोनी कमावतो कोट्यावधी रुपये; मालमत्ता जाणून बसेल धक्का

दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून मैदानात उतरण्यापूर्वीच रोहितला ४४० व्होल्टचा धक्का, सरावदरम्यान झाली दुखापत

त्रिफळाचीत, झेलबाद, धावबाद अन् बरचं.. क्रिकेटमध्ये १० प्रकारे बाद होतो फलंदाज, काही नियम तर ऐकलेही नसतील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---