आशिया चषक २०२२ ही स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत खेळली जाणार आहे. यंदा टी२० स्वरूपात या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २८ ऑगस्टला भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील ब्लॉकब्लास्टर सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे कठीण दिसत आहे. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट याने कार्तिकबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) भारतीय संघात विराट कोहली, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांसारखे फलंदाज आहेत. अशात या फलंदाजांच्या उपस्थितीत कार्तिकला (Dinesh Karthik) प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे अवघड दिसत आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंतची जागा जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या कार्तिकला जागा मिळण्याच्या संधी फार कमी आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बट्टला (Salman Butt) कार्तिकबद्दल विचारले गेल्यावर तो म्हणाला की, असे कोणतेही कारण दिसत नाही, ज्यामुळे कार्तिकला संघाबाहेर केले जाईल. बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.
“हो त्याने नक्कीच खेळले पाहिजे. तो सध्या सर्वोत्तम प्रदर्शन करत आहे. तो इतक्या चांगल्या पद्धतीने डाव संपवतो आहे. तो टॉप क्लास स्ट्राईक रेटने खेळतो. मला वाटते की, स्ट्राईक रेटच्या बाबतीत तो जगातील सर्वोत्कृष्ट ३-४ फलंदाजांपैकी एक आहे. तो शरीरानेही तंदुरुस्त आहे आणि चांगले प्रदर्शन करत आहे. असे कोणतेच कारण नाही, ज्यामुळे त्याने आशिया चषकात खेळू नये”, असे बट्टने (Salman Butt On Dinesh Karthik) म्हटले.
२०१९ ला खेळलीय शेवटची आयसीसी स्पर्धा
कार्तिकने यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने भारताकडून अखेरची आयसीसी स्पर्धा २०१९ साली खेळली होती. २०१९ विश्वचषकात तो शेवटचा खेळला होता. परंतु आयपीएल २०२२ मध्ये आपल्या प्रदर्शनाची चमक दाखवत त्याने भारतीय संघ निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आणि पुन्हा भारतीय संघात जागा बनवली. कार्तिक सध्या भारताच्या टी२० संघात फिनिशरची भूमिका बजावत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर न्यूझीलंडने ‘या’ महत्वाच्या दौऱ्यासाठी जाहीर केलाय संघ! प्रमुख खेळाडूनं केलंय संघात पुनरागमन
‘दिलसे बुरा लगता है!’ सारा तेंडूलकर अन् शुबमन गिलचं ब्रेकअप?
भारतीय फलंदाजांना घाबरले पाकिस्तान! एक गोलंदाजी प्रशिक्षक असतानाही दुसऱ्याची केलीय नियुक्ती