वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला. या विजयात ज्या खेळाडूची भूमिका सर्वात महत्त्वाची होती तो म्हणजे दिनेश कार्तिक. ज्या खेळपट्टीवर भारताचे उर्वरित फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होते, त्या खेळपट्टीवर कार्तिकने वेगवान फलंदाजी करत भारतीय संघाला १९० धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आणि विजयाचा पाया रचला. या सामन्यात भारतासाठी १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करणारा तो एकमेव फलंदाज होता. त्याच्या याच खेळामुळे आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने एक महत्त्वाचे विधान केले आहे.
कार्तिकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये १९ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली. अशा स्थितीत टी२० विश्वचषकाच्या संघात त्याचा समावेश करण्याची चर्चा जोरात रंगत आहे. कार्तिकने आयपीएल २०२२ पासून मागे वळून पाहिले नाही. आयपीएलमधील आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आणि येथेही तो उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावत आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार व सध्या समालोचकाची भूमिका बजावत असलेला सलमान बट आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला
“सुदैवाने दिनेश कार्तिकचा जन्म भारतात झाला. तो पाकिस्तानात असता तर त्याला या वयात देशांतर्गत क्रिकेटही खेळता आले नसते. युवा खेळाडू भारतासाठी चांगली कामगिरी करत आहेत. ते त्यांच्या बेंच स्ट्रेंथबद्दल खूप गंभीर आहेत आणि त्यांनी एक उत्तम संघ तयार केला आहे.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“शुबमन गिलने वनडेत जबरदस्त कामगिरी केली होती. दिनेश कार्तिक संघात उत्कृष्ट फिनिशर म्हणून खेळत आहे. सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज दिवसेंदिवस चांगले होत आहेत. श्रेयस अय्यरही उपलब्ध आहेत. अर्शदीप सिंग शानदार गोलंदाजी करत आहे. एकूणच संघात भरपूर टॅलेंट आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण
पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट