---Advertisement---

‘जार्वो बेअरस्टोला धडकला त्याबद्दल कोणी बोलले नाही’, शास्त्रींच्या टीकाकारांची पाक क्रिकेटरकडून बोलती बंद

On: गुरूवार, सप्टेंबर 16, 2021 12:18 AM
Ravi Shastri
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यापासून भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पाचवा कसोटी सामन्यापूर्वी भारताच्या सपोर्ट स्टाफमधील चार जण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. यात शास्त्री यांचाही समावेश होता.

भारतातील शिबिरात या कोविडच्या उद्रेकासाठी अनेकांनी शास्त्रींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जबाबदार धरले. कारण, शास्त्री पुस्तक प्रकाशनासाठी कर्णधार विराट कोहलीसह उपस्थितीत होते. मात्र, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटचे पूर्णपणे वेगळे मत आहे. तो भारतीय संघाच्या प्रशिक्षकाविरोधातील टीकेशी सहमत नाही. बटच्या मते, शास्त्रींना यासाठी जबाबदार धरणे योग्य नाही.

सलमान बटचा मते, कोरोनाबाबत इंग्लंडमध्ये कोणतेही बंधन नाही. कोणीही सोशल डिस्टनसिंग पाळत नाही आणि सामन्यादरम्यान स्टेडियम लोकांनी भरले होते.

बट म्हणाला, ‘दोन्ही संघ बायो-बबल क्षेत्रात उपस्थित होते. इंग्लंडच्या प्रेक्षकांबद्दल सांगायचे झाले तर, एवढ्या गर्दीत कोणीही मास्क घातलेले आम्ही पाहिलेले नाही. सर्वजण सोशल डिस्टनसिंग न ठेवता एकमेकांच्या शेजारी बसले होते. तिथे सर्व काही खुले आहे आणि त्यामुळे शास्त्रींवर आरोप करणे चुकीचे ठरते.’

शास्त्रींनी अलीकडेच स्वतःचा बचाव करतांना म्हटले होते की, ‘सध्या संपूर्ण इंग्लंड खुले आहे, म्हणून कोरोनाचे प्रकरण समोर आले. माझ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामुळे संघातील कोरोना प्रकरण वाढले असे नाही. संपूर्ण इंग्लंड सध्या खुले आहे, त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यापासूनच काहीही होऊ शकले असते.’

बटने इंग्लंड संघाच्या सुरक्षा व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि जार्वोचे उदाहरण देत तो म्हणाला की, ‘संपूर्ण इंग्लंडला कोरोना प्रोटोकॉलमधून सूट देण्यात आली आहे आणि म्हणूनच भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कठोर बायो-बबलमध्ये खेळवली गेली नाही. आम्ही, इंग्लिश चाहता जार्वोने संपूर्ण कसोटी मालिकेत तीन वेळा व्यत्यय आणल्याचे पाहिले. कडक सुरक्षा असूनही जार्वो मैदानात शिरला आणि जॉनी बेअरस्टोला धडकला, त्यावेळी कोणीही त्यावर बोलले नाही.’

‘जर हे कोणत्याही आशियाई देशात घडले तर इंग्लंडला अडचण निर्माण झाली असती आणि इतर देशही याबद्दल बोलले असते. कारण हे इंग्लंडमध्ये घडले आहे, त्यामुळे ही मोठी समस्या नाही,’ असेही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘धन्यवाद मलिंगा!’ मुंबई इंडियन्स अशा प्रकारे दिल्या आपल्या ‘चॅम्पियन’ गोलंदाजाला निरोप

टी२० क्रमवारी: विराटने घेतली चौथ्या स्थानी झेप, रोहित टॉप-२० मध्येही नाही

एक, दोन नव्हे, तर तब्बल ५ वेळेस हॅट्रिकचा कारनामा, मलिंगाचे ‘हे’ मोठे विक्रम तोडणे अशक्यच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---