श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लिन स्विप केल्यानंतर इंग्लंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विजयासह सुरुवात केली. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमानांनी श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ सामन्यात १८५ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने ९१ चेंडू शिल्लक असताना १८९ धावा करुन सामना जिंकला. सामन्यादरम्यान इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमूना दर्शवित श्रीलंकेच्या खेळाडूला धावबाद केले.
बिलिंग्सचे शानदार क्षेत्ररक्षण
श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना सॅम करनने टाकलेल्या ४३ व्या षटकात बिलिंग्सने ४० मीटर अंतरावरून श्रीलंकेचा फलंदाजाला थेट फेक करत धावबाद केले. या षटकातील एका चेंडूवर चमिका करूणारत्नेने डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला. क्षेत्ररक्षक दूर असल्याने दोन्ही फलंदाजांनी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सॅम बिलिंग्सने दूरवरुन धावत येत अतिशय वेगाने चेंडू उचलत नॉन-स्ट्राइक एंड फेकला. ही फेक इतकी अचूक होती की दुसऱ्या धावेसाठी धावत असलेला प्रवीण जयाविक्रमा धावबाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Bilbo's done it again! ????
Scorecard/clips: https://t.co/1qUI0cauCt
???????????????????????????? #ENGvSL ???????? pic.twitter.com/vC4soKcWKB
— England Cricket (@englandcricket) June 29, 2021
इंग्लंडने मिळवला दणदणीत विजय
संघाचा डाव ४२.३ षटकांत संपुष्टात आला. कर्णधार कुसल परेराने सर्वाधिक ७३ धावा केल्या. या डावादरम्यान त्याने वनडेमध्ये तीन हजार धावाही पूर्ण झाल्या. वनिंदू हसरंगेनेही ५४ धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघातील ८ खेळाडू दुहेरी आकड्यांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. ख्रिस वोक्सने १८ धावा देऊन चार बळी घेतले. याशिवाय डेव्हिड विलीनेही तीन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात इंग्लंडला जॉनी बेअरस्टो व लियाम लिव्हींगस्टोन यांनी वेगवान अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर संघाचा डाव काहीसा कोसळला. मात्र, जो रूट आणि मोईन अली यांनी ९१ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. चार बळी घेणाऱ्या ख्रिस वोक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे ब्रम्हास्त्र ठरतंय निकामी! इंग्लंडविरुद्ध बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूंना दिली जाऊ शकते संधी
WTC ची ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनल खेळविण्यात यावी का? गांगुली यांनी दिले ‘हे’ उत्तर
‘मी हरभजनला मारायला हॉटेलमध्ये गेलो मात्र…’, ‘त्या’ भांडणाबाबत अख्तरचा मोठा खुलासा






