इंडीयन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघातून खेळलेला इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्स याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या लोकप्रियतेचे अनेक किस्से सांगितले आहेत. भारतातीयांचे क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमाचेही त्याने कौतुक केले आहे. बिलिंग्सच्या मते भारतात क्रिकेटची आणि महेंद्रसिंग धोनीची लोक पूजा करतात. बिलिंग्स हा सध्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. त्याने मागील दोन हंगामात आयपीएलचे सामने खेळले नाहीत.
बिलिंग्स जेव्हा सीएसके संघाकडून खेळत होता त्यावेळचा अनुभव त्याने सांगितला आहे. तो म्हणाला की, “जेव्हा मी सीएसके संघाकडून खेळत होतो, तेव्हा मला भारतात विशेष म्हणजे चेन्नईमध्ये धोनीचे अनेक चाहते दिसून आले.”
धोनीसोबतचा ड्रेसिंग रूममधील अनुभव सांगताना पुढे तो म्हणाला की, “जेव्हा मी सीएसके संघात होतो, तेव्हा धोनीला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याचा भारतातील लोकांवर एक वेगळाच प्रभाव आहे. भारतीय लोकांसाठी क्रिकेट हा खूप महत्त्वाचा घटक आहे. परंतु बाहेरील अन्य देशांमध्ये असे बघायला मिळत नाही. माझ्यासाठी भारतात क्रिकेट खेळणे हा क्षण अविस्मरणीय होता. भारतीय लोक क्रिकेटचा खूप सन्मान करतात. इंग्लंडमधील लोक लंडनमध्ये सांगू शकतात की, आम्हाला क्रिकेट नाही आवडत. परंतु संपूर्ण भारतात क्रिकेटची पूजा केली जाते आणि क्रिकेटबरोबर धोनीची पूजा होते.”
“जर इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला भारतामध्ये रस्त्यावरून जाताना कोणी पाहिले तर त्याला कोणीही ओळखणार नाही. परंतु हेच जर जोस बटलर रस्त्यावरून जात असेल; तर तिथे चाहत्यांची खूप गर्दी होईल. विशेष म्हणजे हे फक्त भारतामध्येच होते. क्रिकेट ही भारतासाठी एक संस्कृती बनली आहे,” असे बिलिंग्जने शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशला नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा शोध, तब्बल १००० विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची वर्णी?
प्रत्येक आंतरराष्ट्रीय शतक षटकार मारुनच पूर्ण केलेले खेळाडू, दोन्ही आहेत भारतीय