वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी (3 नोव्हेंबर) अँटिगुवामध्ये खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने 4 विकेट्स राखून विजय मिळवला. असे असले तरी, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू सॅम करन याने या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले. करनने या सामन्यात असे काही केले, जे क्रिकेटमध्ये नेहमी दिसत नाही.
वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना हाय स्कोरिंग ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 325 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 48.5 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावा केल्या आणि मालिकेतील पहिला विजय मिळवला. इंग्लंडचा 25 वर्षीय अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) याने 26 चेंडूत 38 धावांची खेळी केली. पण करनच्या खेळीत खास ठरला तो त्याने घातेलेले सनग्लासेस. होय सॅम करून अक्षरशः हेलमेटच्या आतमध्ये सनग्लासेस घालून फलंदाजी करत होता. कॅरेबियामध्ये सध्या उष्णता जास्त असल्यामुळे खेळाडूंना या सामन्यात खेळताना अधिकची कसरत करावी लागली. सॅम करनने मात्र मागचा पुढचा विचार न करता फलंदाजी करताना सनग्लास लावला, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सॅम करन या कारणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
Sam Curran batting with sunglasses.
In 90’s we saw Brian Lara and specially Jack Russell do it.
Do you guys remember any other cricketer who had glasses on while batting? pic.twitter.com/KcgpaDP4xE— Anirudh Kalra (@CricketKalra) December 3, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने आला आणि पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फील साल्ट आणि झॅक क्राउली यांनी अनुक्रमे 45 आणि 48 धावांची खेळी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हॅरी ब्रुक यांनी 71 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजसाठी अलिक अथनाझे याने 66, तर शाई होप याने 109 धावांची खेळी केली. शाई होपच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने 1.1 षटक आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवला.
उभय संघांतील मालिकेचा विचार केला, तर यजमान वेस्ट इंडीज 1-0 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबर रोजी, तर तिसरा आणि शेवटचा सामना 9 डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. (Sam Curran batted with sunglasses inside his helmet)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला 11 वर्ष जुना किस्सा; म्हणाला, ‘मी विराटला चेतावणी दिली होती की, आज..’
फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 । मुलांच्या गटात लॉयला तर मुलींच्या गटात सेंट जोसेफचे एकतर्फी विजेतेपद






