---Advertisement---

आयपीएलच्या लिलावाआधी सॅम करनला एका गोष्टीचे टेंशन, बेन स्टोक्सशी आहे कनेक्शन

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामाचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीन येथे होणार आहे. या लिलावामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याच्यासाठी सर्वात मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लिलावासाठी त्याची मूळ किमंत 2 कोटी रुपये असून त्याने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या टी20 विश्वचषकात धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे तो मालिकावीर ठरला होता. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याची मागणी वाढेल, असे तर्क लावले जात आहेत. मात्र, या लिलावात त्याला कोणाकडून धोका आहे, हे त्याने स्वत: सांगितले आहे.

सॅम करन (Sam Curran) याचा एक व्हिडिओ द टेलीग्राफने पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मी मागील लिलावातही होतो. मी हा लिलाव टीव्हीवर पाहणार आहे. यामध्ये जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा परिणाम पाहण्यासाठी सज्ज राहा, अशी मनाची तयारी करावी लागते. मला या लिलावात उत्तम किंमत मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याच पंक्तित बेन स्टोक्स आणि बाकीचे अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याचा परिणाम दिसेल. यामुळे काहीही होऊ शकते.”

करनला आयपीएल 2019च्या लिलावात पंजाब किंग्सने 7.2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2020मध्ये पंजाबने मुक्त केले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. या 24 वर्षीय खेळाडूने 32 आयपीएल सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 32 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेत त्याने 337 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 55 राहिली आहे.

करनने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्या स्पर्धेत त्याने सहा सामन्यांमध्ये खेळताना एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी 10 धावांवर 5 विकेट्स अशी राहिली. या त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे तो मालिकावीरही ठरला होता. Sam Curran in tension ahead of the IPL 2023 auction, it is connected Ben Stokes

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या टी20 बरोबर वनडे संघाचाही कर्णधार होणार हार्दिक! रोहितचे आता कसे होणार?
IPL 2023 Auction: पाकिटातील रक्कम, लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे जाणून घ्या एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---