सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील नवव्या सामन्यात ओव्हल इनविन्सिबल आणि नॉदर्न सुपरचार्जर्स संघ आमने-सामने आले. या सामन्यात ओव्हल इनविन्सिबलने शानदार विजय मिळवत आपली घौडदौड कायम राखली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ओव्हल संघाच्या सॅम करन याला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने सामन्यानंतर बोलताना संघाचा कर्णधार जेसन रॉय व प्रमुख फिरकीपटू सुनील नरीन यांचे विशेष कौतुक केले.
सॅम करनने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. प्रथम त्याने गोलंदाजीदरम्यान एक बळी मिळवला. त्यानंतर फलंदाजीतही मोठी खेळी केली. करनने ३९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६० धावा करत संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यात सुनील नरीनची कामगिरीही चांगली झाली. त्याने ११ धावांत ३ बळी घेत सुपरचार्जर्सला विजयापासून वंचित ठेवले.
सामन्यानंतर बोलताना करन म्हणाला,
“हा अतिशय अवघड सामना होता. द हंड्रेडला नेहमीच अशा सामन्यांची गरज असते. आम्ही येथे दोन सामने खेळले आहेत आणि ते शानदार झाले आहेत. या प्रकारचे सामने तुम्हाला आत्मविश्वास देतात. सुनील नरीन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्यावरून तो किती दर्जेदार आहे, हे लक्षात येते. तो नेहमीच प्रत्येक सामन्यात २-३ बळी घेतो. जेसन रॉयचेही कर्णधार म्हणून छाप पाडली आहे. आता आमच्या नजरा रविवारी होणाऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत.”
लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ओव्हल इनव्हिजिबल्सने नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने निर्धारित १०० चेंडूत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओव्हल इनव्हिजिबल्स संघाने ९७ चेंडूत ७ गडी गमावत हे लक्ष्य गाठले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान