---Advertisement---

चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर देशाऐवजी आयपीएलला प्राधान्य देणार ‘हा’ अष्टपैलू?

On: मंगळवार, मार्च 9, 2021 7:47 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यानुसार येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून ३० मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र या वेळापत्रकामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंची चांगलीच अडचण झाली आहे.

कारण २ जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या नियमांमुळे खेळाडूंना बायो बबलच्या दृष्टीने काही दिवस अगोदरच इंग्लंडमध्ये पोहोचणे अनिवार्य असेल. अशा परिस्थितीत आयपीएलचे बाद फेरीचे सामने या खेळाडूंना अडथळा ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरनने आयपीएल की देश कशाला प्राधान्य देणार, यावर भाष्य केले आहे.

चेन्नईकडून खेळणार सॅम कुरन

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मागील हंगामात खरेदी केले होते. मागील हंगामातील चांगल्या कामगिरीच्या आधारे त्याला याही हंगामात चेन्नईने आपल्या संघात कायम ठेवले आहे. पण सॅम कुरन हा इंग्लंडच्या कसोटी संघाचाही सदस्य आहे. त्यामुळे जर चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात बाद फेरीत पोहोचला तर त्याला देश अथवा आयपीएल, यातील एका गोष्टीची निवड करावी लागेल.

याबाबत बोलतांना तो म्हणाला, “गोष्टी कशा घडतात यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे मी आत्ताच काही निश्चित सांगू शकत नाही. जर चेन्नई बाद फेरीत पोहोचली नाही तर मी नक्कीच कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल. मात्र जर चेन्नईचा संघ बाद फेरीत अथवा अंतिम फेरीत दाखल झाला तर मात्र मला विचार करावा लागेल. मात्र मी अद्याप काही ठरवले नाही.”

दरम्यान, इंग्लंडच्याच सगळ्याच खेळाडूंना ही अडचण निर्माण होणार आहे. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळणारे जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली असे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे खेळाडू आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड नेमका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्‍या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय

सिक्सर किंग! भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे हे आहेत पाच खेळाडू

धावांच्या पाठलागात आता पृथ्वीचा डंका! धोनी-कोहली यांना मागे टाकत हा विक्रम केला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---