---Advertisement---

धोनीच्या भिडूचा ‘फुटबॉल किक रनआऊट’ तूफान व्हायरल, तुम्हीही घ्या पाहून

---Advertisement---

क्रिकेटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे किस्से पाहात असतो. कधी कधी ते किस्से खूप गंभीर असतात तर, काही किस्से खूप मजेशीर असतात. सध्या फुटबॉल चाहत्यांवर युरो चषक आणि कोपा अमेरिका स्पर्धांचा जोश चढला आहे. पण तुम्ही कधी क्रिकेटमध्ये कोणी फुटबॉल खेळताना पाहिले आहे का? नाही ना. पण क्रिकेटच्या मैदानावर एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आणि इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने या अनोख्या प्रसंगाचे दर्शन घडवले आहे.

इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिका रंगली आहे. कार्डिफ येथे दुसऱ्या टी-२० सामन्यात हा प्रसंग घडला. श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुणथीलका आणि अविष्का फर्नांडो फलंदाजी करत होते. दरम्यान दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गुणथीलका आणि फर्नांडो एक धाव घेण्यासाठी धावले असता सॅम करनने अतिशय चालाखीने फुटबॉल स्टाइलने गुणथीलकाला धावचीत केले.

झाले असे की, करणने चेंडू टाकल्यानंतर फर्नांडोने तो खेळून काढला आणि पकटन एक धान चोरण्याच्या नादात तो धावत सुटला. दरम्यान, करन चेंडूच्या दिशेने पळाला आणि त्याने त्याच्या उजव्या पायाने चेंडूला फुटबॉल स्टाइलने लाथ मारली. परिणामी चेंडू सरळ जाऊन नॉन स्टाईकर बाजूवरील यष्टीला लागला आणि गुणथीलका धावचीत झाला. त्याचा या फुटबॉल फुटवर्कने इंगलंडच्या फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक साउथगेट यांनासुद्धा प्रभावित केले असावे.

करनने स्काय स्पोर्ट्सला आपल्या या अनख्या पद्धतीबद्दल बोलताना सांगितले, “हा प्रकार मी फुटबॉलप्रती असलेल्या खेळ भावनेला वाव मिळण्यासाठी केला आहे. कारण की, लवकरच इंग्लंडमध्ये फुलबॉल स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे मी खूप खुश आहे.”

स्काय स्पोर्ट्सचे समालोचक डेविड लॉयड करनच्या या गोष्टीवरून प्रभावित झाले आहेत आणि युरो चषकासाठी करनची निवड करण्यात यावी असे सांगितले आहे. त्यांनी समालोचन करताना करनसाठी शब्द उच्चारले, “ओह जबरदस्त फुटवर्क, युरो याला घेऊन जा.”

https://twitter.com/sfcdan_/status/1408120489327931398?s=20

दुसरीकडे श्रीलंका संघाचा खराब फॉर्म कायम असून श्रीलंका संघ सलग दोन टी-२० सामने हारला आहे. गुरुवारी (२४ जून) झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुइस नियमानुसार इंग्लंडचा संघ ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात इंग्लंड संघाकडून लियाम लिविंगस्टोनने २६ चेंडूत सर्वाधिक २९ धावा करत सामनावीर पुरस्कार जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा

‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---