आगामी आयपीएल (Indian Premier League) हंगाम 2025 मध्ये सुरू होणार आहे. त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी आयपीएल हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) नवीन नियम देखील जाहीर केले आहेत. तत्पूर्वी शेवटच्या हंगामात सीएसकेकडून खेळलेल्या समीर रिझवीने (Sameer Rizvi) धोनीची नसून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) भरपूर स्तुती केली आहे.
20 वर्षीय समीर रिझवी (Sameer Rizvi) म्हणाला, “रोहित भाईची फलंदाजी मला खूप प्रोत्साहन देते. त्याची षटकार मारण्याची क्षमता मला प्रेरणा देते. मला त्याची फलंदाजी आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडतो. तो भारताचा सर्वात स्टायलिश फलंदाज आहे.”
समीर रिझवी (Sameer Rizvi) शेवटच्या आयपीएल हंगामात मध्ये खेळताना दिसला होता. गेल्या वर्षी त्याला 8.4 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती आणि सीएसकेने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, यावेळी मेगा लिलावात जगातील अव्वल खेळाडूंचाही समावेश असेल. या कारणास्तव, जर सीएसकने समीरला सोडले तर कदाचित त्याच्यासाठी फार मोठी बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG; शानदार शतक झळकावल्यानंतर कामरान गुलामने बाबरला हिणवले? म्हणाला…
‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला जास्त भीती! ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे वक्तव्य
IND vs NZ; कसोटी सामन्यापूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला…