---Advertisement---

ईएमएमटीसी १४ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत संप्रित शर्मा, अर्णव पापरकर, वेदांत भसीन यांचा विजय

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 6:47 PM
---Advertisement---

औंरंगाबाद। ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत संप्रित शर्मा, अर्णव पापरकर,तनुष घिलदयाल, मार्क्स डार्विन, वेदांत भसीन या मानांकित खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित संप्रित शर्माने अक्ष जुडचा 6-0, 6-1 असा पाचव्या मानांकित अर्णव पापरकरने सफूर लेविनचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित तनुष घिलदयालने आर्यमान गोचवालचा 6-1, 6-1 असा तर चौथ्या मानांकित मार्क्स डार्विनने शिव शर्माचा 6-4, 6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित वेदांत भसीनने पार्थ मेहताचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

स्पर्धेचे उदघाट्न आयएएस श्रीकांत सज्जन (जी. एस. टी चे सहआयुक्त), संजय दत्ता (सरव्यवस्थापक एन्ड्युरन्स) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस. डी. दावलकर (व्यवस्थापक एन्ड्युरन्स) , वैशाली शेकटकर (एआयटीए सुपरवायझर), डॉ. अश्विनी जैस्वाल (फिजिओ) , आशुतोष मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- मुले
संप्रित शर्मा (1) वि.वि अक्ष जुड 6-0, 6-1
अर्णव पापरकर(5) वि.वि सफूर लेविन 6-1, 6-0
तनुष घिलदयाल (6) वि.वि आर्यमान गोचवाल 6-1, 6-1
मार्क्स डार्विन(4) वि.वि शिव शर्मा 6-4, 6-1
वेदांत भसीन (7) वि.वि पार्थ मेहता 6-3, 6-2
रुरिक रजनी वि.वि अमृत धनकर 6-4, 6-1
ओजस मेहलावत वि.वि रोहन वुन्नम 6-2, 6-0
हृषीक वाविलापल्ली वि.वि मयंक कुमार 6-0, 6-0
प्रणव चिरुममिल्ला वि.वि रुद्र बाथम 1-6, 6-4, 6-3
चैतन्य अरुणमणी वि.वि अर्णव बनसोडे 6-0, 6-0
आराध्य क्षितिज वि.वि तनय शर्मा 6-3, 6-2
ऋषी नंदीपती वि.वि अद्विक नाटेकर 7-5, 7-5(2)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---