रिषभ पंतची बहिण साक्षी पंतचा लग्न सोहळा संपन्न होत आहे. तिचं लग्न अंकित चौधरी या मुलाशी होत आहे. तो एक बिझनेसमॅन आहे. त्यामध्ये आता साक्षी पंतच्या लग्नाच्या विधींचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यातीलच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये साक्षीचा भाऊ म्हणजे ऋषभ पंत साक्षीचा हात पकडून चालताना दिसत आहे. उत्तराखंडच्या मसूरी गावात वेगवेगळ्या विधींचे कार्यक्रम होत आहेत. काही मीडिया रिपोर्ट नुसार भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी या कार्यक्रमासाठी मसूरी मध्ये पोहोचले आहेत. तसेच बाकीचे खेळाडू लग्न सोहळ्यासाठी येथे पोहोचतील अशी माहिती मिळत आहे.
उत्तराखंडच्या खानपुर क्षेत्रातील विधायक उमेश कुमार हे सुद्धा लग्न सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की मागच्या रात्री मसुरीच्या एका हॉटेलमध्ये मेहंदी सोहळा संपन्न झाला. आज हळदीची विधी आहे आणि रात्री डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर न्यूज एजन्सी नुसार शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये साक्षी रिषभ सोबत दिसत आहेत. रिषभ पंतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. ज्यावर पिवळ्या रंगाची शॉल घेतली आहे, तसेच बाकीचे संबंधी सुद्धा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
आता होळीचा सण जवळ येत आहे, त्यामुळे लग्न सोहळ्यात होळी सुद्धा साजरी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट विधायक उमेश कुमार बाकीच्या पाहुण्यांना रंग लावताना दिसले. ऋषभ पंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या स्क्वाडमध्ये सामील होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता रिषभ पंत मसूरी मध्ये पोहोचला आहे. साक्षी पंत बद्दल बोलायचे झाल्यास ती खूप दिवसांपासून अंकित चौधरी सोबत नात्यामध्ये आहे. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. या सोहळ्यासाठी लंडनमध्ये एम एस धोनी सुद्धा पोहोचले होते.
हेही वाचा
कोणीही रोहित-विराटला निवृत्त करू शकत नाही! महान भारतीय खेळाडूचे मत
हार्दिकचे सडेतोड उत्तर! पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद
कसोटी क्रिकेटचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव – विशेष सामन्यासाठी रंगणार मैदान!