कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डानं संघाचा दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या याची नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी जयसूर्या श्रीलंकेचा कार्यकारी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत होता. मात्र आता त्याला नियमित प्रशिक्षक बनवण्यात आलंय. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सनथ जनसूर्याची 31 मार्च 2026 पर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जयसूर्याच्या कार्यकारी प्रशिक्षणाखाली श्रीलंकेनं इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. संघानं एक कसोटी सामना जिंकला होता. त्याचबरोबर लंकेनं घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही जिंकली. याशिवाय नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारताचा पराभव केला होता.
गतवर्षी 2023 विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी खूपच खराब राहिली होती. विश्वचषकात संघानं 9 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना 7 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. यानंतर जयसूर्याला संघाचा क्रिकेट सल्लागार बनवण्यात आलं. काही काळानंतर त्याची कार्यकारी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्याच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जयसूर्यानं 1997 मध्ये सलामीला भारताविरुद्ध 340 धावांची खेळी खेळली होती. त्यानं या सामन्यात तब्बल 578 चेंडूंचा सामना केला आणि 36 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते.
सनथ जयसूर्यानं श्रीलंकेसाठी 110 कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी केली, ज्यात त्यानं 40.07 च्या सरासरीनं 6973 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.36 च्या सरासरीनं 13430 धावा केल्या. जयसूर्यानं 31 टी20 सामने खेळले, ज्यात त्यानं 629 धावा केल्या आहेत. त्यानं कसोटीत 14 शतकं ठोकली असून एकदिवसीयमध्ये 28 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
हार्दिक पांड्याचा ‘नो लुक’ शॉट पाहिला का? न बघताच हाणला जबरदस्त चौकार! VIDEO व्हायरल
उपांत्य फेरीच्या शर्यतीत अडकला भारत, पाकिस्ताननं बिघडवलं समीकरण; गणित जाणून घ्या
प्रीती झिंटाच्या संघानं जिंकली पहिली टी20 ट्रॉफी, आरसीबी कर्णधाराच्या नेतृत्वात कमाल कामगिरी!