भारताविरुद्धच्या आगामी टी20 आणि एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेनं संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या यांची नियुक्ती केली. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी टी20 विश्वचषकातील संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता जयसूर्या यांना संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आलंय.
2024 टी20 विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी खूपच खराब राहिली होती. संघानं गट टप्प्यात एकूण 4 सामने खेळले, ज्यापैकी फक्त 1 सामना जिंकला आणि 2 सामने गमावले. पावसामुळे एका सामन्याचा निकाल लागला नाही. यानंतर मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक कारणांचा हवाला देत त्यांनी श्रीलंकेचं प्रशिक्षकपद सोडण्याची घोषणा केली होती. यापूर्वी महेला जयवर्धने यांनीही क्रिकेट सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता.
या दोघांच्या राजीनाम्यानंतर आता जयसूर्या यांच्याकडे अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते टी20 विश्वचषकात सल्लागार म्हणून संघासोबत होते. त्यामुळेच आता त्यांना संघाचं प्रशिक्षक बनवण्यात आलंय. असं असलं तरी श्रीलंकेचा संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू ठेवणार आहे.
आयसीसी टूर्नामेंटमध्ये श्रीलंकेची कामगिरी गेल्या बऱ्याच वर्षांपासून चांगली नाही. ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या प्रशिक्षणाखाली संघानं 2022 मध्ये टी20 आशिया कपचं विजेतेपद पटकावलं. या संघानं 2023 च्या आशिया कप फायनलमध्येही प्रवेश केला होता, जिथे त्यांना भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय सिल्व्हरवुडच्या कोचिंगखाली श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका त्यांच्या घरच्या मैदानावर जिंकली. तर बांगलादेशमध्ये देखील कसोटी मालिका जिंकली.
मात्र असं असलं तर, मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये श्रीलंकेच्या संघाला पूर्वीसारखी कामगिरी करता येत नाहीये. त्यामुळे आता जनसुर्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारताविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत संघ कसा खेळतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिषेक शर्मानं शुबमन गिलची बॅट उधार घेऊन ठोकलं शतक, काय आहे कारण?
एक शर्मा गेला, दुसरा शर्मा आला! झिम्बाब्वेविरुद्ध युवराजच्या शिष्याचा कहर
लॉर्ड्सवर शर्ट फिरवून दाखवली होती ‘दादागिरी’! कांगारुंना पुरुन उरणाऱ्या गांगुलीची कहानी