श्रीलंकाचा माजी कर्णधार आणि धाकड फलंदाज सनथ जयसुर्या सध्या दु:खद प्रसंगाचा सामना करत आहे. त्याचे वडील डंस्टन जयसुर्या यांचे रविवारी (१३ डिसेंबर) दिर्घकालीन आजारामुळे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, जयसुर्याच्या जवळच्या सुत्रांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली आहे. सोमवारी डंस्टन यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
सनथ जयसुर्याच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी थोडेसे…
वयाच्या २०व्या वर्षी अर्थातच १९८९ मध्ये जयसुर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर फेब्रुवारी १९९१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याला श्रीलंका कसोटी संघात स्थान मिळाले. तर मर्यादित षटकांच्या टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला २००६पर्यंत वाट पाहावी लागली.
५१ वर्षीय अष्टपैलू दिग्गज सनथ जयसुर्याला खासकरुन त्याच्या विस्फोटक सलामी फलंदाजीसाठी ओळखले जाते. तसे तर, जयसुर्याला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षात मधल्या फळीत फलंदाजी करावी लागली होती. परंतु, ११९६ सालच्या विश्वचषकात श्रीलंका संघाचा तत्कालिन कर्णधार अर्जुन रणतुंगाने जयसुर्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने करत जयसुर्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा कायापालट केला.
जयसुर्याने वनडे क्रिकेटमध्ये एकूण ४४५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.३६च्या सरासरीने १३४३० धावा केल्या आहेत. तर ३२३ विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटी आणि टी२० क्रिकेटमध्ये जयसुर्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने कसोटीत ११० सामन्यात ६९७३ धावा ९८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३१ टी२० सामन्यांत ६२९ धावा आणि १९ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लंका प्रीमियर लीग: उपांत्य फेरीआधी गिब्सने सोडले किंग्सचे प्रशिक्षकपद, ‘हे’ आहे कारण
लॉकी फर्ग्युसनच्या अनुपस्थितीने योजनेत बदल नाही, पाकिस्तानच्या युवा फलंदाजाचे मत
रिषभ पंत दुसरा ऍडम गिलख्रिस्ट! माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया