क्रिकेटजगतात एखाद्या क्रिकेटपटूची दुसऱ्या क्रिकेटपटूशी तुलना करण्यात आल्याचे प्रसंग बऱ्याचदा पाहायला मिळतात. नुकतीच प्रसिद्ध भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंत त्यांना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट यांची आठवण करुन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध झालेल्या सराव सामन्यातील पंतच्या जबरदस्त कामगिरीला पाहता चोप्रा यांनी हे वक्तव्य केले आहे.
गिलख्रिस्ट यांच्याशी केली तुलना
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाले की, “पंत ऍडम गिलख्रिस्टसारखा आहे. गिलख्रिस्ट यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे. तर दुसरीकडे पंतची कारकिर्द नुकतीच सुरु झाली आहे. तरीही पंत खेळताना सर्वांना गिलख्रिस्टची आठवण करुन देतो. माझ्या मते, तो कारकिर्दीच्या शेवटपर्यंत नक्कीच गिलख्रिस्टने साध्य केलेल्या गोष्टी मिळवेल. पंतमध्ये खालच्या फळीत फलंदाजीला येऊन डावाचा कायापाटलट करण्याची क्षमता आहे.”
..म्हणून पंतला दिला पुरस्कार
तसेच पंतच्या शानदार फलंदाजीला पाहता चोप्रा यांनी त्याला ‘प्लेयर ऑफ द डे’ घोषित केले. चोप्रा म्हणाले की, “पंत माझ्यासाठी ‘प्लेयर ऑफ द डे’ ठरला आहे. सुरुवातीला हनुमा विहारीला मी या पुरस्काराने सन्मानित करणार होतो. पण पंतच्या ताबडतोब फलंदाजीमुळे मला विहारीऐवजी पंतला हा पुरस्कार द्यावा लागला. पंतने त्याच्या जबरदस्त फलंदाजीने विरुद्ध संघाच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणून सोडले.”
सराव सामन्यात पंतने ठोकले शतक
भारत आणि ऑस्ट्रलिया ‘अ’ संघात झालेल्या दिवसरात्र सराव सामन्यात पंतने अफलातून शतकी खेळी केली. पहिल्या डावात पंत केवळ ५ धावांवर बाद झाला. परंतु, दुसऱ्या डावात त्याने कमालीची खेळी केली. पंतने दुसऱ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०३ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने फक्त ७३ चेंडूमध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने हा पराक्रम केला.
महत्त्वाच्या बातम्या-
NZvsWI: दुसऱ्या कसोटीतही वेस्ट इंडीजची दयनीय अवस्था; होऊ शकतो डावाने पराभव
रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ
रो-हिट है, मामला फिट है! आजच्याच दिवशी ३ वर्षांपूर्वी रोहितने रचला होता ‘हा’ विक्रम






