श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू सनथ जयसुर्या यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दोन वर्षासाठी बंदी घातली होती. हा दोन वर्षाचा बंदीचा काळ संपला आहे. त्यानंतर आता मेलबर्नचे क्लबचे प्रशिक्षक म्हणून क्रिकेट जगात ते पुनरागमन करणार आहे. आयसीसीने जयसूर्या यांना भ्रष्टाचार नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी फेब्रुवारी 2019 ला त्यांना 2 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती.
हेरल्ड सनच्या बातमीनुसार, श्रीलंकेचे माजी सलामी फलंदाज तिलकरत्ने दिलशाननी जयसूर्या यांना हे पद सांभाळण्यासाठी तयार केले आहे. मुळग्रेवचे अध्यक्ष मालिन पुले नये गमनी सांगितले की, दिलशानने आमच्यासाठी मार्ग करून दिला आणि ही आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आमच्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. दिलशान आणि या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला उपुल थरंगा मुलग्रेव क्लबकडून खेळणार आहेत.
जयासुर्या 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघात सहभागी होते. त्यांनी 110 कसोटी आणि 445 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार आहेत. त्याच्या काळातील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. जयसूर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दमदार कामगिरी करणारे आणि सामना जिंकून देणारे अष्टपैलू खेळाडू कामगिरीमुळे प्रसिद्ध आहे.
जयसूर्या यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास चार दशकांपर्यंत पसरली होती. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 हून अधिक धावा करणारे आणि 300 हून अधिक बळी घेणारे ते एकमेव खेळाडू आहेत आणि म्हणूनच मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणतो, विराट कोहली आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वात आहे ‘हा’ फरक
वेस्ट इंडिज, इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर; मोईन खान यांच्या मुलाला मिळाली संधी
बापरे! तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह






