---Advertisement---

संघ सहकाऱ्याच्या सल्ल्याने ‘या’ मुंबईकर क्रिकेटपटूने बॉलीवूडमध्ये नशीब आजमावले अन् होत्याचे नव्हते झाले!

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 1:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये ८० च्या दशकात एक असा क्रिकेटपटू आला, ज्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने व लूक्सने सर्वांना हैराण केले. तो मैदानावर उतरतात चाहते बेफाम होत. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक स्टायलिश क्रिकेटर होते मात्र संदीप पाटील यांची बात और होती. याच कारणाने क्रिकेटव्यतिरिक्त त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील नशीब आजमावून पाहिले. संदीप यांची चाहत्यांमधील विशेषता मुलींमधील क्रेझ पाहून संघ सहकारी सय्यद किरमाणी यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी सल्ला दिला. हा सल्ला त्यांनी मानला व चित्रपटात पदार्पण देखील केले.

हा होता पहिला चित्रपट
संदीप पाटील यांनी १९८५ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘कभी अजनबी थे’ व त्या चित्रपटाची नायिका होती सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एक नव्हे तर ३ क्रिकेटपटूंनी या चित्रपटात काम केले होते. मुख्य नायक संदीप पाटील यांच्याशिवाय सय्यद किरमाणी खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. इतकेच नाही तर वेस्ट इंडीजला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावलेली. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळू शकला नाही व फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर संदीप पाटील यांची क्रिकेट कारकीर्द देखील उतरणीला लागली.

संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हादेखील सध्या चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने काही मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच, भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजयावर येऊ घातलेल्या चित्रपटात तो आपल्या वडिलांची भूमिका साकारताना दिसेल.

विश्वचषक विजेत्या संघाचा होते भाग
संदीप पाटील हे देशांतर्गत क्रिकेट मध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत. त्याकाळी आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजयात देखील त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी बॉब विलीस यांच्या एकाच षटकात सहा चौकार मारण्याची किमया केलेली. मोहम्मद अजहरुद्दिन यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाल्यानंतर पाटील यांना संघातील जागा गमवावी लागली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केनिया संघाचे प्रशिक्षकपद भूषवत संघाला २००३ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिलेली. पुढे, त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---