इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेल्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी आला आहे. मात्र याचवेळी सनरायझर्स हैदराबादच्या एक युवा प्रतिभान गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.
डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
आयपीएलमध्ये शनिवारी (31 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
संदीप शर्माने विराट कोहलीला केले बाद
डेविड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्माला गोलंदाजी दिली. या गोलंदाजाने कर्णधाराला अजिबात निराश केले नाही. डावाच्या तिसर्या षटकात संदीप शर्माने आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला त्रिफळाचित केले. त्यानंतर पाचव्या षटकात त्याने आरसीबीला मोठा धक्का दिला. संदीपने दिग्गज फलंदाज आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. विराटने संदीपच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण पुढे उभे असलेला क्षेत्ररक्षक केन विल्यमसनने त्याचा झेल घेतला.
विराटला सर्वाधिक 7 वेळा केले बाद
विराट कोहलीला संदीप शर्माने आयपीएलमध्ये सातव्यांदा बाद केले आहे. तो आयपीएलमध्ये विराटला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम आशिष नेहराच्या नावावर होता.
पॉवरप्लेमध्ये घेतले 50 बळी
विराट कोहलीची विकेट घेताच संदीप शर्माने एक विशेष कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये 50 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. संदीप शर्माने पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत 51 बळी घेतले आहेत. त्याच्या आधी फक्त झहीर खान याने पॉवरप्लेमध्ये 52 बळी घेतले होते.
संदीपच्या नावाची चर्चाच होतं नाही -इरफान पठाण
27 वर्षीय संदीप शर्माने आयपीएलमध्ये खेळलेल्या 89 सामन्यात 110 बळी घेतले आहेत. परंतु असे असूनही त्याच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, “आयपीएलमध्ये संदीप शर्माच्या 100 हून अधिक विकेट्स आहेत आणि त्याने विराट कोहलीला सर्वाधिक 7 वेळा बाद केले आहे, परंतु अद्याप कोणीही त्यांच्या नावाची चर्चा करत नाही. बरं, संदीप शर्माबद्दल कुणी बोलत असेल अथवा नसेलही परंतु त्याच्या कामगिरीवरून सिद्ध होते की तो एक प्रतिभावान गोलंदाज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
-आई फक्त तुझ्याचमुळे! मुंबईच्या इशान किशनने फलंदाजीचे श्रेय दिले आईला
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स
हा तर सेम धोनीच..! डी कॉकने चपळाईने केली अय्यरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स