नेपाळचा प्रमुख फिरकीपटू व कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर करण्यात आलेला बलात्काराच्या आरोप प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्याने आपल्यावरील आरोपांचे खंडन केलेले. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या विरोधात जे अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, त्याबाबत त्याने आता उत्तर दिले असून, तो स्वतः पोलिसांपुढे स्वाधीन होणार आहे.
संदीप हा आपल्यावर लावण्यात आलेला आरोपानंतर सातत्याने आपण निर्दोष असल्याचे म्हणत आहे. त्याने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत आपली व्यथा मांडली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे त्याने म्हटलेले. आता प्रकरण अधिकच गंभीर होत असताना त्याने आपण स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याचे एका पोस्टमधून म्हटले. त्याने लिहिले,
मोठ्या आशेने आणि ताकदीने, मी जाहीर करतो की मी 6 ऑक्टोबर 2022 रोजी माझ्या देशात नेपाळला पोहोचत आहे. माझ्याविरुद्धच्या खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी नेपाळी पोलिस अधिकाऱ्यांसमोर स्वत: आत्मसमर्पण करत आहे.’
नेपाळ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे पुन्हा एकदा म्हटले. त्याने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचे वचन दिले आहे. या गंभीर गुन्ह्याच्या खोट्या आरोपांविरुद्धच्या खटल्यात जलद निकालाची अपेक्षा त्याने व्यक्त केलीये.
संदीप लामिछाने याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपाखाली फरार घोषित केले होते. कोर्टाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलेले. मात्र, तो देशात नसल्याने नेपाळ पोलिसांच्या विनंतीनंतर इंटरपोलने 26 सप्टेंबर रोजी त्याच्याविरुद्ध डिफ्यूजन नोटीस जारी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्यांदा इंडिया लिंजेड्स बनला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा दारून पराभव
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर