पुणे। संगम यंग बॉईजने दोन्ही सत्रात एकेक गोल करून पीडीएफए फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीतील एका महत्वपूर्ण सामन्यात केशव माधव प्रतिष्ठानचा (केएमपी) 2-0 असा पराभव केला.
एसएसपीएमएस मैदानावर खेळल्या गेलेल्या क गटातील सामन्यात, राहुलने केएमपीची सुपर 8 पात्रता थांबवली. पूर्वार्धात सत्येन पाटील (24 वा) याने खाते उघडले, तर दुसऱ्या सत्रात सागर पुजारी (३६व्या) याने दुसरा गोल करून संघाचा विजया साकार केला. हा विजय त्यांना पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तृतिय श्रेणीतील सामन्यात बीटा एफसी संघाने केशव माधव प्रतिष्ठान संघाचा 1-0 असा पराभव केला. एकमात्र गोल यशोधाम पाटील (59 वा) याने केले. याच गटातील पिंपरी चिंचवड एफसीला इंद्रायणी एससी ब संघाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. युवी चव्हाणच्या सुरवातीच्या गोलने एफसी पिंपरी चिंचवडला आघाडी मिळवून दिली. पण नंतर सुमित घोंडे (7वा), मनोजसाठी (45वा) यांनी इंद्रायणी ‘ब’चा विजय साकार केला.
निकाल-
सप महाविद्यालय मैदान- तृतीय श्रेणी
गट सी – बीटा एफसी : 1 (यशोधम पाटील 59वे) वि.वि. केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हन : 0
गट डी – इंद्रायणी एससी ‘ब’ : 2 (सुमित घोंडे 7वे, मनोज साठी 45वे) वि.वि. एफसी पिंपरी चिंचवड: 1 (युवी चव्हाण 4थे मिनिट)
गट डी – शिशु : 1 (सॅम्युअल डॅनियल 35वे) बरोबरी वि. पूना सोशल एससी : 1 (जेसी डोडाके 15वे मिनिट)
गट ब – आर्यन्स एससी ‘ब’: 3 (सिद्धार्थ हरिहर 9वे; केवल वैटी 18वे, गौरव नाडर 47वे) वि.वि. व्हिन्सेंट्स ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) ‘बी’: 2 (जीतू गंगवानी 23वे प्रथमेश देडगे 27वे)
गट एच – भारती एफसी: 8 (नांगाईसन स्वेर 8वे, 17वे, 20वे, 29वे, 35वे, केइन रोम 25वे, 45वे, लिओगीत सिंग 37वे) वि.वि. किड्स इलेव्हन : 0
गट एफ – कॉन्सियंट एफसी: 1 (कुणाल ढमाले 25वे) वि.वि. परशुरामियन्स ‘सी’ : 0
हॉटफुट मैदानावर -गंगा लिजेंड्स बावधन (अंडर-16 )
गट ब – क्रीडा प्रबोधिनी: 10 (निशित फडके 2रे, 16वे, 37वे, युग अग्रवाल 23वे, ,26वे, , 34वे, साई पाटील 12वे, , 50वे, राज पाटील 44वे, आरव भारद्वाज 42वे, ) वि.वि. दक्ष एफए : ०
गट सी – लौकिक एफए : 1 (अस्मय गायकवाड 5वे) बरोबरी वि. मॅथ्यू एफए : 1 (ऑस्टिन अल्लाप्पट 50वे)
गट अ – स्टेपओव्हर एफए 6 (रोहन कात्याल 7वे, , 10वे, 19वे, आर्या चौघुले १७वे, 43वे, रेहान खान 36वे) वि.वि. जुन्नर तालुका : 0
एसएसपीएमएस मैदान- द्वितीय श्रेणी
गट ब – राहुल एफए : 2 (रवी यादव 10वे, रोहित जयसिंघानी 54वे) वि.वि. जायंटस : 1 (जीवन नलगे 29वे)
गट सी – घोरपडी तामिळ युनायटेड : 2 (नेल्सन जोसेफ 25वे, 37वे) वि.वि. गोल्फा बुशरेंजर्स : 1 (पुनित गेलोत 52वे)
गट सी – संगम यंग बॉईज: 2 (सत्येन पाटील 24वे; सागर पूजारी 36वे) वि.वि. केशव माधव प्रतिष्ठान : 0
गट ए – सनी डेज : 1 (विनायक अनमोल 52वे) वि.वि. व्हॅली हंटर्स : 0
पूल-ड: अशोका इलेव्हन: 2 (रविकिरण एमएम 7वा, 38वा) डायनामाइट्स: 2 (श्रेयश कडस्कर 11व्या; अनिकेत भारसाकळे 28व्या) बरोबरी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी वॉरियर्सच्या विजयात निलिशा, राशीची हॅट्रिक
अशोका इलेव्हन, लिजेंड्स युनायटेडचा सहज विजय
घोरपडी तमिळ युनायटेड, केएमपीचे चुरशीचे विजय