---Advertisement---

पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग स्पर्धेत सांघवी शुटर्स, मनिषा रॉयल्स संघांचे विजय

On: रविवार, सप्टेंबर 18, 2022 5:14 PM
---Advertisement---

पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत साखळी फेरीत सांघवी शुटर्स, मनिषा रॉयल्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात गिरीश दामले, संजय सांघवी, रणजीत पांडे, राजु खांडके यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर सांघवी शुटर्स संघाने बॉल ब्रेकर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात मनिषा रॉयल्स संघाने मनप्रीत अँड गौरव जगवॉर्स 4-1संघावर असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून कुणाल वासवानी, माधव क्षीरसागर, पंकज परमार,  राजन खिंवसरा यांनी सुरेख खेळी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

सांघवी शुटर्स वि.वि.बॉल ब्रेकर्स 3-2(15 रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: गिरीश दामले वि.वि.विनोद मखिजा 111-37; दुहेरी: संजय सांघवी/रणजीत पांडे वि.वि.टोनी/संजय जाधव 89-72; हँडीकॅप बिलियर्ड्स: राजु खांडके वि.वि.आरके शर्मा 200-195; 6 रेड हँडीकॅप स्नूकर: धीरज कोचर पराभुत वि.प्रशांत राजघरीया 18-47, 52-76; ब्लु शूटआऊट: शाम राठी पराभुत वि.अंगद साहनी 2-3);

मनिषा रॉयल्स वि.वि.मनप्रीत अँड गौरव जगवॉर्स 4-1(15 रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: कुणाल वासवानी वि.वि.तुषार आस्वानी 102-97; दुहेरी: सिद्धार्थ थडाणी/समीर सांघवी पराभुत वि.अरविंद केरिंग/हुझेफा ताहेरभोय 72-99; हँडीकॅप बिलियर्ड्स: माधव क्षीरसागर वि.वि.प्रणय मालगावकर 200-184; 6 रेड हँडीकॅप स्नूकर: पंकज परमार वि.वि.आशिष मेहता 47-42, 37-48, 53-24; ब्लु शूटआऊट: राजन खिंवसरा वि.वि.जयदीप पटवर्धन 2-0);

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानी निवडकर्त्याचे टीम इंडियाला ओपन चॅलेंज! म्हणाला…
‘आशिया चषकाचे सोडा विराटने शतक केले’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केले किंग कोहलीचे कौतुक
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---