काही दिवसांपूर्वीच युएई येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला होता. परंतु, सुपर 4 मध्ये पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत त्या पराभवाचे उठे काढले. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला त्यानंतर श्रीलंकेने ही पराभूत करत, स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करूनही भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे भारताचे आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न अधुरी राहिले. आता याच खेळामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संघाची तुलना होतेय. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख मोहम्मद वसीम यांनी याच मुद्द्याला धरून भारतीय संघावर टीका केली आहे.
पाकिस्तान संघाच्या चांगल्या कामगिरीनंतर पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांनी आपल्या संघाचे कौतुक केले. त्याचबरोबर भारत व पाकिस्तानच्या संघाच्या तुलनेबाबत बोलताना वसीम म्हणाले,
“भारताचा संघ मिलियन डॉलर संघ आहे यात शंका नाही. मात्र, पाकिस्तान संघ गेल्या वर्षभरात दोन वेळा त्यांच्यावर वरचढ ठरला आहे. मला आशा आहे की पुढील विश्वचषकातही ते आपल्या देशातील लोकांना खुश करण्याची संधी सोडणार नाहीत.”
पाकिस्तानने मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला दहा गडी राखून पराभूत केले होते. पाकिस्तानचा हा कोणत्याही विश्वचषकातील भारतावरील पहिला विजय होता. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ इंग्लंडसोबत 7 टी20 सामन्यांची मोठी मालिका खेळेल.
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी , शान मसूद, उस्मान कादिर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी





