पुणे (21 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज दुसरा सामना सांगली विरुद्ध बीड यांच्यात झाला. सांगली संघाने प्रमोशन फेरीत 2 पैकी 1 सामना जिंकला होता. तर बीड संघाने दोन्ही सामने गमावले होते. बीडच्या शंकर मेघाने ने सलग 2 चढाईत गुण मिळवत बीड संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. तर अभिषेक गुंगे व अभिराज पवार यांनी चढाईत तर नवाज देसाई ने पकडीत गुण मिळवत सांगली संघाला आघाडीवर आणले.
सांगलीच्या अभिराज पवार ने चतुरस्त्र चढाया करत संघाची आघाडी वाढवली. अभिराज ला अभिषेक गुंगे ने चांगली साथ देत बीड संघाला ऑल करत सामन्यात आघाडी मिळवली. अभिराज पवार या स्पर्धेत चढाईत 100 गुण पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरला. मध्यंतराला सांगली संघाने 19-11 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर बीड संघाच्या शंकर मेघाने ने आक्रमक खेळ करत सुपर टेन पूर्ण केला. तर शशिकांत दास ने हाय फाय पूर्ण केला. मध्यंतरा नंतर 6 व्या मिनिटाला बीड संघाने सांगली संघाला ऑल आऊट करत संघाची पिछाडी कमी केली. 23-22 अशी केवळ 1 गुणांची आघाडी सांगली कडे होती.
सांगलीच्या अभिराज पवार ने सुपर टेन पूर्ण करत पुन्हा एकदा आपल्या संघाची आघाडी वाढवली. 31-24 अशी आघाडी सांगली कडे असताना संदेश देशमुख ने सुपर रेड करत सामन्यात चुरस वाढवली. त्यानंतर पाच मिनिटं शिल्लक असताना बीडच्या पवन खांदे ने सुपर रेड करत सामना 31-34 असा सामना जवळ आणला होता मात्र सांगली ने उत्तरार्धात सावध खेळ करत सामना 42-35 असा आपल्या नावे केला. अभिराज पवार ने चढाईत 16 गुण मिळवले. तर अभिषेक गुंगे ने चढाईत 12 गुण मिळवले. नवाज देसाई ने पकडीत एकूण 4 गुण मिळवले. बीड कडून शंकर मेघाने ने 13 गुण तर शशिकांत दास ने पकडीत एकूण 5 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अभिराज पवार, सांगली
बेस्ट डिफेंडर- शशिकांत दास, बीड
कबड्डी का कमाल – अभिराज पवार, सांगली
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत अहमदनगर, पालघर व कोल्हापूर संघांचा सलग दुसरा विजय
अश्विन ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचं काय नातं? सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झाली चर्चा